मिठी मारायची असेल तर झाडाला मारा अन्...

israel nature and parks authority suggests hug a tree at corona time
israel nature and parks authority suggests hug a tree at corona time

जेरुसलेम (इस्राईल): जगरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे विविध देशांनी लॉकडाऊन सुरु केल्यामुळे नागरिक घरामध्ये बसून कंटाळले आहेत. यामुळे झाडाला मिठी मारा अन् दुःख कमी करण्याचे आवाहन नेचर अँड पार्क अथॉरिटीने केले आहे.

कोरोना व्हायरसने दैनंदिन आयुष्य पुर्णपणे बदलून टाकले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना एकटेपण आले असून, मानोसपचारतज्ञांची गरज घ्यावी लागत आहे. कोरोना सारख्या रोगामुळे माणूस माणसापासून दूर चालला आहे. भेटच नाही तर गळाभेट दूर, सध्या अशी परिस्थिती ओढावली आहे. एखाद्या व्यक्तीची गळाभेट घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. कुटुंबापासून दूर असणाऱ्यांची स्थिती तर बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही झाडांना मिठी मारून आपले दुःख कमी करू शकता.

इस्राईलच्या नेचर अँड पार्क अथॉरिटी नागरिकांना झाडांना मिठी मारण्याचे आवाहन केले आहे. अपोलिनिया नॅशनल पार्कमध्ये प्राधिकरणाचे मार्केटिंग संचालक ओरिट स्टेइनफिल्ड यांचे सांगितले की, कोव्हिड-19 मध्ये एकटे राहण्यापेक्षा निसर्गाशी जोडले जा आणि एक खास अनुभव मिळवा. या कठीण काळात आम्ही जगभरातील लोकांना निसर्गाची भटकंती करणे, दीर्घ श्वास घेणे, झाडे लावणे, प्रेम व्यक्त करणे प्रेम मिळवण्याचा सल्ला देत आहोत. तेल अवीवपासून 15 किमी लांब या पार्कमध्ये प्रशासनाने लोकांना झाडांना मिठी मारण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना मिठी मारू शकत नाही. अशा वेळी झाडांना मिठी मारणे निश्चितच चांगला अनुभव आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com