Video: विमानात अचानक पाणी लागले गळू...

वृत्तसंस्था
Tuesday, 14 July 2020

विमानातून प्रवास करत असताना अंगावर पाणी गळेल का? यावर नाही असेच उत्तर असेल. पण, एका विमानात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळू लागल्यामुळे त्यांनी छत्रीचा आधार घेतला. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मॉस्को (रशिया) : विमानातून प्रवास करत असताना अंगावर पाणी गळेल का? यावर नाही असेच उत्तर असेल. पण, एका विमानात प्रवाशांच्या अंगावर पाणी गळू लागल्यामुळे त्यांनी छत्रीचा आधार घेतला. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: कब्रस्तानातून जिवंत माणूस आला बाहेर...

विमानातील प्रवासी रशियातील आहेत. रशियाच्या रोस्सिया एअरलाईन्सच्या एका विमानात ही घटना घडली आहे. हे विमान खोबरोव्स्कहून सोचीला जात होते. यावेळी विमानातील एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी गळायला सुरवात झाली. पावसाचे वातावरण असल्यामुळे प्रवाशांजवळ छत्र्या होत्या. पाणी गळती होत असलेल्या ठिकाणच्या प्रवाशांनी छत्रीचा आधार घेतला. यावेळी विमानातील काही प्रवाशांनी मोबाईलमधून शुटींग केले. संबंधित व्हिडिओ 11 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोस्सिया एअरलाईन्सने याबाबत खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एसीमध्ये गळती झाली होती. त्यामुळे पाणी गळत होती. यामुळे प्रवासी छत्री घेऊन बसले होते.

मला पण अशीच सासू हवी; व्हिडिओ व्हायरल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger sitting in flight with umbrella at russia video viral