
जेरूसलेम : लेबनॉनमधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेने शस्त्रत्याग केल्यास त्या देशातून सैन्य माघारी घेऊ, असे आश्वासन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले आहे. तसेच, हिज्बुल्लाच्या नि:शस्त्रीकरणासाठी प्रयत्न करण्याच्या लेबनॉन मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांना यात सहकार्य करण्याचे आवाहनही नेतान्याहू यांनी केले आहे.