
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा संघर्ष कमी होण्याची चिन्हे नाहीत.
VIDEO - 'शत्रूला शांत करणारच', इस्रायलचा पॅलेस्टाइनला इशारा
जेरुसलेम - इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाइन (Palestine) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. हमासकडून (Hamas) सातत्यानं रॉकेट हल्ला केला जात आहे. अल जजीराने याबाबत वृत्त दिले आहे. गाझा (Gaza) शहरातील हमासचा कमांडर बास्सेम इस्सा इस्रायलच्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झाला. हमास ग्रुपकडूनही कमांडरच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. इस्रायलच्या 6 तर 53 पॅलेस्टाइनच्या नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा संघर्ष कमी होण्याची चिन्हे नाहीत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गॅट्स यांनी बुधवारी रात्री म्हटलं की,''आमचं लष्कर गाझा पट्टी आणि पॅलेस्टाइनवर हल्ला सुरुच ठेवेल. आमचे सैन्य अजुनही थांबलेलं नाही. जोपर्यंत शत्रूला पूर्ण गप्प बसवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. शत्रूला संपवल्यानंतरच पुढचं बोलणं करण्यात येईल.''
दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणार हल्ला केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की,''आम्ही हमासचे 6 कमांडर ठार केले आहेत. मोठ्या संख्येनं त्यांच्या बिल्डिंग, कारखाने आणि भुयारी मार्ग उद्ध्वस्त केले.'' इस्रायालच्या लष्कराने प्रवक्त्यांनी सांगितले की,''आमचे लष्करी अधिकारी आणि जवान आता कोणत्याही शस्त्रसंधीच्या बाजूने नाहीत. पॅलेस्टाइनने जी परिस्थिती निर्माण केली आहे ते पाहता आम्हाला यावर आता कायमचा उपाय शोधला पाहिजे'' इस्रायलने ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे ती पाहता दोन्हींमधील हा संघर्ष वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.