esakal | रॉकेट हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबाची इस्रायल घेणार काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

kerala women

इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये संघर्ष सुरु (israel palestine conflict) आहे. गाझा पट्टीमधून इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात येत आहेत.

रॉकेट हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबाची इस्रायल घेणार काळजी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

तेल अविव- इस्त्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये संघर्ष सुरु (israel palestine conflict) आहे. गाझा पट्टीमधून इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात येत आहेत. आतापर्यंत 1,500 पेक्षा अधिक रॉकेट डागण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे इस्त्रायल आर्मीही याला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. बुधवारी पॅलिस्टिनी कट्टरवादी संघटना हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये केरळमधील एका महिलेचा (kerala women) मृत्यू झाला होता. इस्त्रायलने यासंदर्भात महिलेच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. (israel palestine conflict Rony Yedidia Clein Israel Dy Envoy women body flown back to India)

आम्ही पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत होती, त्याचवेळी हल्ला झाला. आम्हाला जाणीव आहे की, पतीसाठी हा किती भयानक क्षण असेल. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, असं इस्त्रायलचे डेप्युटी राजदूत म्हणाल्या. राजदुतांचं कुटुंबियांसोबत बोलणं झालं आहे. त्यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. तेल अविवच्या दूतावासाने महिलेचे पार्थिव भारतात पाठवण्याची तयारी केलीये. लवकरत त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्यात येईल, असं रॉनी येडिजिअ क्लेईन म्हणाल्या.

इस्त्रायलकडून महिलेच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात येईल, तसेच त्यांना भरपाई करण्यात येईल. पण, एक आई आणि पत्नी जाण्याची भरपाई आम्ही कधीही करु शकत नाही, असं रोनी येडिजिअ क्लेईन म्हणाल्या. दरम्यान, पॅलिस्टिनी दहशतवादी संघटनेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात केरळमधील महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेसोबत एक वृद्ध महिलेचाही हल्ल्यात मृत्यू झाला होता.

loading image