Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

Eisenkot Backed by Arab Parties Amid Coalition Deadlock: या निवडणुकीत कोणत्याही पारंपारिक आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय कोंडीत अरब पक्षांनी विक्रमी १९ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत 'किंगमेकर'ची भूमिका पटकावली.
israel

israel

esakal

Updated on: 

इस्रायलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणाचं सरकार येणार, याबाबत जगभरात चर्चा आहे. मात्र येत्या दोन दिवसांमध्ये याबाबत स्पष्टता येईल, कारण इस्रायली राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्जोग हे रविवारी सरकार स्थापनेची जबाबदारी कोणाकडे सोपवायची याची अधिकृत घोषणा करणार आहेत.

१२० सदस्यीय नेसेटमध्ये कोणत्याही एका गटाला बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा आकडा गाठता आलेला नाही. काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील युतीला ५३ जागांवर विजय मिळाला आहे, तर विरोधी पक्षांचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांच्या आघाडीला ४८ जागा मिळाल्या.

Loading content, please wait...