esakal | जगातील सर्वात अभेद्य तुरुंगाला सुरुंग, 6 पॅलेस्टिनी फरार
sakal

बोलून बातमी शोधा

Six Palestinian Escape

जगातील सर्वात अभेद्य तुरुंगाला सुरुंग, 6 पॅलेस्टिनी फरार

sakal_logo
By
सुधीर काकडे

एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल अशी घटना काल इस्रायलच्या गिलबोआ जेलमध्ये घडली. इस्रायलच्या (Israel) सर्वात कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगातून मुंगी सुद्धा बाहेर पडू शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र याच जेलमधून काल 6 पॅलेस्टिनी (Six Palestinian militants) भुसुरुंग खोदून पसार झाले. जेलची कडक सुरक्षा भेदुन हे 6 पॅलेस्टिनी पळाल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. इस्रायलच्या उत्तरेकडील भागात पोलिसांनी शोधमीहीम सुरू केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक शेतामधून जात असल्याचं त्यांना दिसलं होत. त्यानुसार जेल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

गिलबोआ तुरुंगात (Gilboa prison) ही घटना घडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने इस्त्रायल विरुद्धच्या कारवायांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या काही इतर कैद्यांना देखील दुसरीकडे पाठवले आहे. हे कैदी देखील भुसुरुंग खोदून पळून जातील, या भीतीने तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. फरार झालेल्या 6 आरोपींपैकी 5 हे इस्लामिक जिहाद चळवळीतचे सदस्य असून, त्यातला एक जण फतेह पार्टीशी संलग्नित एका अतिरेकी गटाचा सदस्य आहे. तर या 6 जनांपैकी 4 जण हे हल्ला घडवून इस्रायली नागरिकांना मारण्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत होते, तर उर्वरित दोघांपैकी एक नजरकैदेत आणि एक निकालाच्या प्रतीक्षेत होता.

पलायन करण्यासाठी कैद्यांनी वापरेलेलं भुसुरुंग

पलायन करण्यासाठी कैद्यांनी वापरेलेलं भुसुरुंग

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान यांनी, आपण सुरक्षा मंत्र्यांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. तसेच ही घटना गंभीर असून फरार झालेल्या 6 जणांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सर्व प्रयत्न करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेले 6 जण हे पश्चिम किनाऱ्यावर जाऊ शकतात. या ठिकाणाहून जॉर्डनियन बॉर्डर ही फक्त 9 मैल म्हणजे 14 किलोमीटरवर आहे. गाझा पट्टीमध्ये या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला गेला. इस्लामिक जिहाद समर्थकांनी रस्त्यावर लोकांना चॉकलेट वाटले. आज, इस्लामिक जिहादच्या नायकांनी गिलबोआ तुरुंगात मोठी कामगिरी केली. या कामगिरीने इस्त्रायलची भीती मोडीत काढली असल्याची प्रतिक्रिया, गाझा येथील इस्लामिक जिहादचा प्रवक्ता खमीस अल-हैथम याने दिली आहे.

हेही वाचा: 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

गिलबोआ तुरुंग प्रशासनाकडून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कैद्यांनी सेलच्या स्वच्छतागृहाशेजारी खोदलेले खंदक उघडून अधिकारी त्याचे निरक्षण करताना दिसता आहेत. तर ही घटना घडताच सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा झाली. पॅलेस्टिनी आणि इस्त्रायलींनी 1994 मध्ये तुरुंगातून पळून जाणाऱ्या द शाशांक रिडेम्पशन चित्रपटातील तत्सम दृश्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. कारागृह सेवेचे कमांडर एरिक याकोव्ह यांनी सांगितले की, सुरूंगातून बाहेर पडल्यावर पळून जाण्यासाठी कैद्यांनी तुरुंग प्रशासनाने बांधकामासाठी बनवलेल्या रस्त्याचा वापर केला.

पलायन करण्यासाठी कैद्यांनी वापरेलेलं भुसुरुंग

पलायन करण्यासाठी कैद्यांनी वापरेलेलं भुसुरुंग

loading image
go to top