esakal | 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

पाकिस्तानच्या मदतीनेच तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवू शकले असा आरोप अमरुल्ला सालेह यांनी केला होता.

'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबुल - अफगाणिस्तान ताब्यात मिळवल्यानंतर तालिबानने त्यांची दहशत पसरवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने तालिबानचे उघड समर्थन केले आहे. यावर काबुलपासून ते अमेरिकेत वॉशिंग्टनपर्यंत विरोध दर्शवला जात आहे. न्यूज संस्था एएफपीच्या वृत्तानुसार, काबुलमध्ये मंगळवारी पाकिस्तानविरोधात सुरु असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी तालिबानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक महिला आणि मुलं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा तालिबानने केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने तालिबानतर्फे ड्रोन अटॅकही केला आणि आयएसआय प्रमुख फैज अहमद यांनी काबुल दौरा केला. यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानला धारेवर धरलं जात आहे. यातच अफगाणिस्तानात लोग काबुलमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर जवळपास ७० हून अधिक लोक आंदोलन करीत असून यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्या हातात पाकिस्तान विरोधी घोषणा असलेले फलक आहेत.

हेही वाचा: पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये महिला त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र काबुलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे आंदोलन झालं. काबुलशिवाय अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्येही रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. लोकांकडून पाकिस्तानवर पुन्हा निर्बंध लादण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: पंजशीरच्या युद्धात उतरणाऱ्या पाकिस्तानला इराणने फटकारलं, चौकशीची मागणी

पंजशीरमध्ये नॅशनल रेसिस्टन्स फोर्सचे नेतृत्व कऱणाऱ्या अहमद मसूदने सांगितलं की, पाकिस्तान हवाई दल सातत्याने हल्ले करत आहे. ते तालिबानला मदत करत असून आता आमचा लढा पाकिस्तानसोबत आहे. कारण पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या लढ्यात तालिबानचे नेतृत्व करत आहे. याआधी अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अनेकदा म्हटलं आहे की, पाकिस्तान तालिबानला सर्व प्रकारची मदत करत आहे. पाकिस्तानच्या मदतीनेच तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवू शकले असा दावाही अमरुल्ला सालेह यांनी केला आहे.

loading image
go to top