

मध्यपूर्व देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू आहे. जवळजवळ प्रत्येक आघाड्यावर इस्रायलचा सहभाग दिसून येत आहे. आता इस्रायलने सीरियावरही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला केला, ज्यामध्ये संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करण्यात आले. सोमवारपासून इस्रायल सीरियाच्या इस्लामिक नेतृत्वाखालील सरकारच्या सैन्याला लक्ष्य करत आहे.