इस्रायलचा मीडिया कार्यालयांवर AIR STRIKE

'द असोसिएटेड प्रेस', 'अल जजीरा'ची कार्यालये उद्धवस्त
Israel-Hamas
Israel-HamasGoogle file photo

जेरुसलेम: गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये (Israeli airstrike) गाझा पट्ट्यातील (gaza) अनेक मोठ्या इमारती जमीनदोस्त (building collapse) झाल्या आहेत. इस्रायली लष्कराने नागरिकांना इमारत सोडण्यास सांगितली. त्यानंतर तासाभरातच हा स्ट्राइक झाला. एअर स्ट्राइकमध्ये इमारतींना का लक्ष्य केले? त्या बद्दल कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Israeli airstrike destroys AP Al Jazeera offices in Gaza)

एअर स्ट्राइकमध्ये ज्या इमारती जमीनदोस्त झाल्या, त्यात 'द असोसिएटेड प्रेस', 'अल जजीरा' आणि अन्य कंपन्यांची कार्यालय होती. शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १० पॅलेस्टाइन ठार झाले. यात लहान मुलांची संख्या जास्त आहे, असे एपीने वृत्तात म्हटले आहे.

Israel-Hamas
धक्कादायक! वसईत भटक्या कुत्र्यासोबत वृद्धाचे लैंगिक चाळे

इस्रायल आणि हमासमधील हा संघर्ष वाढतच चालला आहे. पॅलेस्टाइनमध्ये इस्रायल विरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. शेकडो तरुण आंदोलक इस्रायली सैनिकांनी भिडले. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एपीने दिले आहे. सौदी अरेबियाने रविवारी मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाइन्सवर जो अत्याचार, हिंसाचार सुरु आहे, त्यावर या बैठकीत चर्चा होईल. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमधील ५७ मुस्लिम देशांचे परराष्ट्र मंत्री या व्हर्च्युअल बैठकीत सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com