इस्राईल-पॅलेस्टाइन वाद चिघळला; हवाई हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू

Israeli
Israeli file photo

जेरुसलेम- इस्राईल (Israeli ) आणि पॅलेस्टाइन (Palestinian) यांच्यातील संघर्षाने अधिक हिंसक वळण घेतले असून रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने गाझा येथे केलेल्या प्रतिहल्ल्यात (air strike) किमान २४ जणांचा मृत्यू झाला. पॅलेस्टाइनमधील कट्टरतवादी हमास या संघटनेच्या ताब्यात असलेल्या स्थानांवर हा हल्ला करण्यात आला. (The Israeli Palestinian conflict 24 killed in air strike rocket)

गेल्या काही आठवड्यांपासून जेरुसलेममध्ये इस्राईलचे सैनिक आणि पॅलेस्टीनी नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी सोमवारी रात्रीपासून इस्राईलच्या दिशेने रॉकेट हल्ले सुरु केले. त्यांनी जवळपास २०० रॉकेट डागले. यामध्ये इस्राईलचे सहा नागरिक जखमी झाले. इस्राईलने तातडीने प्रत्युत्तर देत हवाई हल्ला केला. यात २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी १५ जण दहशतवादी असल्याचा इस्राईलचा दावा असला तरी यामध्ये ९ बालकांचा मृत्यू झाल्याचा हमासचा आरोप आहे.

Israeli
यूएई-इस्त्राईल करार : आशादायी पण... 

जेरुसलेम शहरावर पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचा दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षाला काही आठवड्यांपुर्वी पुन्हा तोंड फुटले असून वेस्ट बँक, गाझा पट्टी येथेही शेकड्यांच्या संख्येने अरब समुदायातील लोक एकत्र येत इस्राईलचा निषेध करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून इस्राईलचे सैनिक या जमावावर अश्रुधुराचा मारा केला आहेत. यामध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक जखमी झाले आहेत.

Israeli
इस्त्राईल-पॅलेस्टाईन पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर

सुरक्षा परिषदेत चर्चा

जेरुसलेममधील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीने बैठक बोलावत चर्चा करण्यात आली. इस्राईलने अरबांना हुसकावणे बंद करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. चर्चेच्या माध्यमातून हा वाद मिटू शकेल, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला.

आमची भूमी, सैनिक आणि नागरिकांवर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही. ज्यांनी कोणी हल्ला केला आहे, त्यांना त्याची भारी किंमत चुकती करावी लागणार आहे, असं इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com