यूएई-इस्त्राईल करार : आशादायी पण... 

यूएनआय
Saturday, 15 August 2020

संयुक्त अरब अमिराती (यूएई), अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यातील शांतता कराराने अरब जगतात, अमेरिका आणि तिच्या मित्र देशांत तसेच जगात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा मागोवा घेतला तरी ७२ वर्षानंतरच्या घटनेने समीकरणे बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

संयुक्त अरब अमिराती (यूएई), अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यातील शांतता कराराने अरब जगतात, अमेरिका आणि तिच्या मित्र देशांत तसेच जगात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा मागोवा घेतला तरी ७२ वर्षानंतरच्या घटनेने समीकरणे बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अरब जगातातील ‘यूएई’ हा आखातातील पहिला आणि अरब विश्वातील जॉर्डन आणि इजिप्तनंतरचा तिसरा देश ठरला की, ज्याने इस्त्राईलशी संबंध स्थापन केले. सुन्नींचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. असे मानले जाते की, त्याच्या आशीर्वादानेच हा करार झालाय, त्यामुळे आगामी काळात आणखी अरब देश इस्त्राईलशी संबंध स्थापित करण्याची शक्‍यता आहे. त्याचे होणारे संभाव्य परिणाम - 

US Election:"जो बायडेन राष्ट्रपती झाले तर अमेरिका जगभरात थट्टेचा विषय होईल"

अमेरिका आणि ट्रम्पना फायदाच 
चीनशी ताणलेले संबंध, अफगाणिस्तानातून घेतलेली माघार, इराण आणि उत्तर कोरियाविषयक धोरणातील अपयश आणि तीन महिन्यांवरील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वासमोरचे आव्हान आणि कोरोनाच्या हातळणीतील अपयशाने भवितव्याबाबत चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवरील या कराराने ट्रम्पना राजनैतिक विजयाचा फायदा होऊ शकतो. ट्रम्प विरोधक बिडेन यांनीही त्यांची री ओढली, कराराचे स्वागत केलंय. आगामी काळात आणखी अरब देश इस्त्राईलशी संबंध निर्माण करू शकल्यास ट्रम्पना बळच मिळणार. बिदेन यांनी इस्त्राईलच्या पॅलेस्टिनींचा भूभाग काढून घेण्याला विरोध केला असून, ‘जर अध्यक्ष झालो तरी आपण विरोधच करू’, असेही म्हटले आहे. 

5 काय 500 राफेल आणले तरी फरक पडत नाही; पाकिस्तानची पोकळ धमकी

इराणविषयी दृष्टिकोन बदलला 
ट्रम्प यांनी ‘यू टर्न’ घेत बराक ओबामा यांनी इराणशी सुधारलेले संबंध बिघडवले, अधिक आर्थिक निर्बंध लादले होते. सध्या त्यांचे लक्ष पूर्व आशियाकडे आहे, ते पुन्हा यानिमित्ताने पश्‍चिम आशियाकडे वळले आहेत.

इस्त्राईलच्या नेतान्याहूंना दिलासा 
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू देशांतर्गत आव्हानांचा सामना करताहेत. कोरोनाच्या हाताळणीतील अपयश आणि निवडणुकीत पॅलेस्टाईन व्याप्त पश्‍चिम किनारपट्टीचा काही भाग ताब्यात घेण्याचा दिलेला इशारा खरा करून दाखवणे आवश्‍यक होते. पण, पॅलेस्टिनींचा मुद्दा आणि शांततेची चर्चाही पुढे सरकत नव्हती. कराराने नेतान्यूहूंची पतघसरण थांबू शकते. कारण, त्यांनी भूभाग ताब्यात घेतला असता तर अमेरिका आणि अरब देश यांच्याशी संबंध ताणले गेले असते. 

उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 

जगभरातल्या प्रमुख प्रतिक्रिया 
हमास : हा करार म्हणजे पॅलेस्टिनींच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. पॅलेस्टाईनच्या अस्तित्वाला सुरूंग आहे. 
हनान अश्रवणी, पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे प्रवक्ते : हा करार म्हणजे मित्रानेच विकून टाकणे होय. 
जॉर्डन : शांतताप्रक्रियेला या कराराने गती मिळेल. पॅलेस्टाईनच्या मान्यतेतील अडथळा दूर होईल. इस्त्रायल यात अयशस्वी झाला, तर वाद वाढून, सुरक्षेला धक्का पोहोचेल. 
इजिप्तचे अध्यक्ष अबदेल फतेह अल सिसी : कराराने इस्त्रायलचा पॅलेस्टिनी भूभाग ताब्यात घेण्याला खीळ बसेल आणि शांतता नांदेल. 
बहारिन : कराराचे स्वागतच. सौदी अरेबियाचा मित्र बहारिन आहे, पण सौदीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 
संयुक्त राष्ट्रे : ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अन्तोनियो गुटेरस यांनी कराराचे स्वागत करताना त्या भागात शांतता नांदेल, असे म्हटले आहे. 
इराण : हा करार म्हणजे धोरणात्मक मूर्खपणा आहे. पॅलेस्टाईनची अत्याचारीत जनता कधीच क्षमा करणार नाही. 
तुर्कस्तान : करार म्हणजे निव्वळ ढोंगीपणाच. पॅलेस्टिनींना त्याला विरोधाचा अधिकार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UAE Israel agreement promising