इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मुलाने हिंदूची मागितली माफी

वृत्तसंस्था
Tuesday, 28 July 2020

इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुलाने हिंदुंची माफी मागीतली आहे. नेतन्याहू यांचा मुलगा यैर याने सोशल मीडियालर एक आक्षेपार्ह फोटो टाकला होता

जेरुसलम- इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुलाने हिंदुंची माफी मागीतली आहे. नेतन्याहू यांचा मुलगा यैर याने सोशल मीडियालर एक आक्षेपार्ह फोटो टाकला होता. यानंतर काही भारतीय लोकांनी या फोटोबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर यैरने तात्काळ हा फोटो काढून टाकत हिंदूंची माफी मागितली आहे.

रविवारी यैर याने ट्विटरवर हिंदू देवी दुर्गाची फोटो ट्विट केली होती. या फोटोमध्ये देवी दुर्गाच्या जागी लिएट बेन एरी यांचा चेहरा दाखवण्यात आला होता. लिएट बेन एरी बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर चालू असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील फिर्यादी आहेत. 29 वर्षीय यैर सोशल मीडियामध्ये चांगलाच सक्रिय असतो. शिवाय आपले वडील बेंजामिन नेतन्याहू यांच्या नितींचे तो जोरदार समर्थन करत असतो. यैरने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक भारतीयांनी यावर आपत्ती दर्शवली होती. त्यानंतर यैर याने हे ट्विट डिलिट करत माफी मागितली आहे.

भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव, तर पाकिस्तानात 'काळा दिवस'
मी एक मीम ट्विट केलं होतं. ज्यात इस्त्राईलमधील एका लोकप्रिय व्यक्तीवर टीका करण्यात आली होती. मला माहित नव्हतं की हा मीम हिंदुंची आस्था असणाऱ्या एका फोटोलाही चित्रित करत आहे. माझ्याकडून अनावधानाने ही चूक झाली आहे. माझ्या भारतीय मित्रांची प्रतिक्रिया आल्यानंतर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा लगेच मी ते ट्विट काढून टाकले आहे. मी याबद्दल हिंदूची माफी मागतो, असं यैर म्हणाला आहे. त्याने यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

यैर याच्या ट्विटवर अनेक भारतीयांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे काही भारतीयांनी त्याला हिंदू धर्माची फारशी माहिती नसल्याने त्याच्याकडून ही चूक झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय आपली चूक स्वीकारुन माफी मागितल्याबद्दल इस्त्राईली लोकांनी यैरचे कौतुक केलं आहे. 

लॉकडाउन वाढवल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू, प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा
दरम्यान, जेरुसलमच्या एका न्यायालयात इस्त्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात विश्वासघात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावर सुनावणी सुरु आहे. मात्र, नेतन्याहू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Israeli Prime Minister Benjamin Netanyahus son apologizes to Hindus