Israel-Hamas War : नरसंहार सुरूच! गाझातील शाळेवर बॉम्बहल्ला; 30 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश

Israel-Hamas War : मोठ्या प्रमाणावर टीका होत असूनही, नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्राइलने गाझामधील एका शाळेवर बॉम्ब हल्ला केला असून किमान यामध्ये 30 पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत.
Israeli strike on Gaza school that military says was being used by Hamas kills 30 people
Israeli strike on Gaza school that military says was being used by Hamas kills 30 people Esakal

गाझा शहरात इस्राइलचा नरसंहार अद्याप सुरूच आहे. जगभरातून टीका होत असूनही, नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर त्यांचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत. तर, अनेक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

आज (गुरुवारी) सकाळी, चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने गाझा येथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानाने किमान तीन शाळेच्या वर्गांवर बॉम्बहल्ले केले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले आहेत. इस्राइलचे हल्ले मध्य गाझा येथील एका शाळेवर झाले. या शाळेत शेकडो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे.

Israeli strike on Gaza school that military says was being used by Hamas kills 30 people
Bird Flu Human Death: 'बर्ड फ्लू'चा जगातला पहिला मृत्यू; कोरोनानंतर वाढली चिंता, WHO ने केली पुष्टी

हमास संचालित गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने एका निवेदनात शाळेवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला "भयानक नरसंहार " म्हटले आहे. इस्रायली सैन्याने हे हल्ले चालू ठेवणे हा नरसंहाराच्या गुन्ह्याचा स्पष्ट पुरावा आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या गुन्ह्यांची संपूर्ण जबाबदारी इस्राइल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे कार्यालयाने म्हटले आहे. या घटनेवर इस्रायली बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Israeli strike on Gaza school that military says was being used by Hamas kills 30 people
Lok Sabha Result: जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव! जो बायडेन, पुतिन, मेलोनी; नरेंद्र मोदींना कोणत्या जागतिक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा?

अमेरिका इस्राइलला सोडणार नाही

दुसरीकडे, गाझा आणि रफाहमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार करणाऱ्या इस्रायली लष्करावर अमेरिकेने संयम राखला आहे. अमेरिकन सरकार इस्राइलला आपला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) इस्राइलविरुद्धच्या कारवाईवर कारवाई करण्यासाठी त्यांनी संसदेत कार्यवाही सुरू केली आहे. आयसीसीच्या या निर्णयावर अमेरिका संतापली आहे, ज्यामध्ये नेतान्याहू आणि इस्रायली अधिकाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाऊ शकते.

Israeli strike on Gaza school that military says was being used by Hamas kills 30 people
Lok Sabha election: लोकसभेच्या निकालाबाबत जगाला काय वाटतं? पाकिस्तान, तुर्की, ब्रिटनसारख्या देशांची प्रतिक्रिया काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com