esakal | पॅलेस्टाइननंतर सीरियामध्ये इस्रायलचा मोठा AIR STRIKE
sakal

बोलून बातमी शोधा

Israel strike

पॅलेस्टाइननंतर सीरियामध्ये इस्रायलचा मोठा AIR STRIKE

sakal_logo
By
दीनानाथ परब

डामास्कस: पॅलेस्टाइन नंतर इस्रायलने (Israeli) आता सीरियाकडे (Syria) मोर्चा वळवला आहे. इस्रायलाने बुधवारी रात्री सीरियावर एअर स्ट्राइक (air strike) केला. यामध्ये ११ जण ठार झाले आहेत. मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या सीरियन निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सीरियातील होम्स प्रांतातील लष्कर आणि नागरिक सेनेच्या ११ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. सीरियन लष्कराचे सात सैनिक आणि राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे चार असा एकूण ११ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, असे रामी अब्दुल रहमान यांनी AFP ला सांगितले. (Israelis air strikes in Syria)

ठार झालेले सर्वजण सीरियन आहेत. मध्यरात्री पूर्वी हा एअर स्ट्राइक झाला. सीरियन युद्ध विश्लेषकांकडून सीरियातील निरीक्षकांवर नेहमीच मृतांचा आकडा वाढवून सांगितल्याचा आरोप केला जातो. रात्री ११.३० नंतर लेबनॉनच्या बाजूने डागण्यात आलेली इस्रायली मिसाइल्स एअर डिफेन्स सिस्टिमच्या मदतीने पाडण्यात आली, असा लष्करी सूत्रांच्या हवाल्याने 'साना' या सीरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीत १० जूनला लसीकरण केंद्र राहणार बंद

लेबनॉनच्या हिजबोल्लाह दहशतवादी गटाचा शस्त्रास्त्र डेपो आणि होम्स प्रांताच्या बाहेरील बाजूस खीरबत अल-तीन गावाजवळ असलेल्या सीरियन एअर फोर्सच्या तळाला टार्गेट करण्यात आले, अशी माहिती निरीक्षकांनी दिली. इस्रायली एअर फोर्सने मंगळवारी संध्याकाळी सीरियातील काही भागात स्ट्राइक केले. यात राजधानी डामास्कसचा सुद्धा समावेश आहे.