कल्याण-डोंबिवलीत १० जूनला लसीकरण केंद्र राहणार बंद

बुधवार पहाटेपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Vaccination
Vaccinationesakal

मुंबई: मुंबईसह शेजारच्या कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivli) आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळेच उद्या १० जून रोजी कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरातील लसीकरण बंद राहणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. (no COVID-19 vaccination in Kalyan-Dombivli on June 10)

मुसळधार पावसामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. "भारतीय हवामान विभागाने कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा दिला आहे. हीच बाब ध्यानात घेऊन दोन्ही शहरातील लसीकरण गुरुवारी बंद राहणार आहे" असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Vaccination
मुंबईची माणुसकी! लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिला अल्पोपहार

बुधवार पहाटेपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. महापालिकेने कारणाशिवाय अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे नागरिकांना सांगितले आहे. "२००५ साली कल्याण-डोंबिवलीत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. तसा पाऊस उद्या कोसळू शकतो" असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Vaccination
पावसाचा तडाखा! जाणून घ्या मुंबईत कुठे, काय नुकसान झालं

आजच्या पावसामुळे कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमधील सखल भागात पाणी साचले होते. वीज पुरवठाही खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. लोकल सेवाही ठप्प झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com