दुबईहून मृतदेह भारतात आणण्यासाठी सव्वा लाखांचा खर्च, तर जिवंत व्यक्तीसाठी 25 हजार

flight
flight

चंदीगड- कोरोना महामारीमुळे अनेक पंजाबी लोक परदेशात अडकले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने एका वेळचे जेवन मिळनेही कठीण झालं आहे. अशात काही लोकांनी आत्महत्येचे पाऊलही उचलले आहे. परदेशात अडकलेल्या लोकांना देशात घेऊन येण्याचे आव्हान असताना मृतदेहांनाही येथे घेऊन यावे लागत आहे. सर्वसाधारण एका मृतदेहाला परत आणण्यासाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च येतोय, तर तेच एका जिवंत व्यक्तीला परदेशातून घरी आणण्यासाठी 25 हजारांचा खर्च येत असल्याचं सरबत का भला ट्रस्टचे प्रमुख एस.पी. सिंह ओबेराय यांनी सांगितलं. 

चिनी कंपन्यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीसारखे; अमेरिकेचा पुन्हा हल्लाबोल
कोरोनाच्या संकटामुळे दुबईतील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. शिवाय कंपन्यांचे मालकही पसार झाले आहेत. अशात कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनही मिळाले नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. लोक एका वेळच्या जेवणासाठी तळमळत आहेत, असं सिंह यांनी सांगितलं. 

दुबईतील पीडित लोकांनी आमच्याशी संपर्क केला. आमच्याकडे खाण्यासाठी काही नाही, शिवाय तिकिटासाठीचे पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासाठी 4 जहाजांची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील पहिले जहाज 7 जूलैला 171 लोकांना घेऊन चंदीगडला पोहोचले आहे. दुसरे जहाज मंगळवारी 174 लोकांना घेऊन अमृतसर येथे पोहोचले. तिसरे जहाज 19 जूलै रोजी चंदीगड येथे पोहोचेल आणि चौथे जहाज 25 तारखेला अमृतसर येथे पोहोचेल. विमानांची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. पण तिकिटासाठी लोकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे आम्ही जहाजांची व्यवस्था केली असल्याची माहिती सिंह यांनी दिली.  

आतापर्यंत त्यांच्याकडून 178 तरुणांचे मृतदेह भारतात आणले असल्याचं सिंह म्हणाले आहेत. पार्थिव भारतात आणण्यासाठी सव्वा लाख रुपये लागतात. तर जिवंत व्यक्तीला आखातातून भारतात आणण्यासाठी 25 हजार रुपये लागत आहेत. परदेशात ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे, त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दुबईत 19 वयाच्या जवळजवळ 14 पंजाबी तरुणांनी आत्महत्या केली आहे.  त्यांच्यातील काहींचे मृतदेह भारतात आणण्यात आले आहेत आणि काहींचे लवकरच पोहोचतील, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने राजस्थानमध्ये एका आमदाराला किती पैसे देण्याचे ठरवले होते? गेहलोत म्हणतात...
सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही मृतदेहांना आणण्यापेक्षा जिवंत मानसांना येते आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आवश्यकता लागल्यास आणखी 4 जहाजे पंजाबला पाठवण्यात येतील, कारण अडचणीत येऊन पंजाबी मुलं काही चुकीचं पाऊल उचलू नये असं आम्हाला वाटतं, असं सिंह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com