ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WHO on Oicron

ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO

सध्या जगभरात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील पॉझिटिव्ह रेट (India Positivity Rate) वाढला असून ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन हा सौम्य आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, ओमिक्रॉनला सौम्य म्हणणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनची ७ लक्षणं, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

ओमिक्रॉन रुग्णांना डेल्टाच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याचा धोका कमी दिसत असला तरी ओमिक्रॉन ''फक्त सौम्य'' आहे, असं म्हणणं घातक ठरू शकतं. धोका कमी असतानाही पॉझिटिव्हीटी रेट धक्कादायक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.

WHO ने यापूर्वीच दिला होता इशारा -

जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना ओमिक्रॉनबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच ओमिक्रॉनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल. त्याविरोधात उपाययोजना करण्यास देखील डब्लूएचओने सांगितलं होतं. तसेच कार्यक्रम आणि मेळावे देखील रद्द करण्यास सांगितले होते. पण, भारतात याविरोधात स्थिती दिसतेय. अजूनही सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.

देशात कोरोनाचे किती रुग्ण?

देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तसंच गेल्या चोवीस तासात देशभरात 19 हजार 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6.43 टक्क्यांवर गेला आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 82 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2 लाख 85 हजार 401 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशातील 3 कोटी 43 लाख 41 हजार 009 रुग्ण कोरोनातून रिकव्हर झाले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top