
मॉस्को : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणासाठी रशियाला पाठिंबा देण्यासाठी इंग्रजीतील 'Z' अक्षर हे 'सिम्बॉल ऑफ वॉर' ठरलं आहे. हे अक्षर सुरुवातीला रशियन रणगाड्यांवर दिसून आलं होतं जेव्हा हे रणगाडे युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते. पण या Z अक्षराची तुलना सोशल मीडिया युजर्सनी स्वस्तिकशी केली आहे. जी हिटरलच्या नाझी सैन्याची निशाणी होती. (It the new swastika the letter Z has become Russia symbol of war)
यासंदर्भात समोर आलेल्या फोटोंवर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये रशियातून बाहेर पडणं हे खरोखरच त्रासदायक असल्याचं एकानं म्हटलं आहे. दुसर्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या हातून उद्ध्वस्त झालेल्या देशासाठी आता रशियाही त्याच मार्गावर जाताना दिसत आहे. त्यांच्या शर्टवरील 'Z' कडे पाहा.... ही फक्त वाहनावरील ओळख नाही, हे नवं स्वस्तिक आहे. युरोपनं आता जागं व्हावं!! असं एका युजरनं म्हटलं आहे.
रशियन रणगाडे आणि शस्त्रांवरील या अक्षरांचा अर्थ काय असू शकतो यावर अनेक सिद्धांत आहेत. एक सिद्धांत असा दावा करतो की, Z चा अर्थ युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आहे तर V चा अर्थ व्लादिमीर पुतिन आहे. पण, सिरिलिक रशियन वर्णमालामध्ये Z किंवा V ही अक्षरं अस्तित्वातच नाहीत. दुसरा दावा असा सांगतो की, रशियन रणगाड्यांवर ही अक्षरे गोळीबार टाळण्यासाठी आणि रशियन सैन्यांना एकमेकांना ओळखण्यास मदत करण्यासाठी ही चिन्ह चितारली गेली आहेत.
रशियन संरक्षण मंत्रालयानं त्याच्या इंस्टाग्राम पेजवर Z आणि V अक्षरांचे ग्राफिक्स देखील पोस्ट केले आहेत. दरम्यान, यांचा अर्थ काय आहे याबद्दल कोणतंही निश्चित स्पष्टीकरण दिलेलं नाही. काही इंस्टाग्राम पोस्टमध्ये आधुनिक काळातील रशियन सैन्याच्या तुलनेत जुन्या सोव्हिएत सैन्याच्या प्रतिमा देखील आहेत आणि रशियन भाषेत 'हिरो' असे मथळे आहेत. काही जण असाही दावा करतात की, Z चा अर्थ 'Za pobedy' (विजयासाठी) किंवा 'Zapad' (पश्चिम) असू शकतो तर V चा अर्थ 'सत्याची ताकद' असा असू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.