Anti-Vaxxer : लस नको म्हणून कोरोना पॉझिटिव्हसोबत करतायेत पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Party

ऐकावं ते नवलंच! लस नको म्हणून कोरोना पॉझिटिव्हसोबत करतायेत पार्टी

Dining with death: कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा वाढत आहे. जिथे देशांमध्ये लसीकरणासोबत बुस्टर डोस दिला जात आहे तर काही देशात कोरोना लस घेणे टाळून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे. असाच काहीसा प्रकार इटलीमध्ये दिसून आला. येथील बहूतेक युवक लसीकरणाविरोधात आहे. लस घेण्यापासून वाचण्यासाठी हे लोक पैसे देऊन कोरोना संसर्ग झालेल्या लोकांसोबत पार्टी करत(Anti-Vaxxer)आहे.

इटली या देशाला कोरोना महामारीचा खूप फटका बसला आहे. तिथे सध्या एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. येथे पैसे देऊन लोक कोरोना संसर्ग झालेल्या लोकांसोबत डिनर करतात आणि वाईन पित आहे. त्यासाठी लोकांना १६० डॉलर(१० हजार रुपये) अशी मोठी रक्कम देत आहे

हेही वाचा: कोरोना लस फक्त कोविडच नाही तर इतर आजारांपासून बचावासाठीही उपयुक्त

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इटलीमध्ये जे लोक कोरोनाचा संसर्ग व्हावा यासाठी कोरोना (Dinner With Corona Infected in Italy) संसर्ग झालेल्या लोकांसोबत वाईन पीत आहे आणि डिनर करत आहे. त्यांना अॅन्टी वॅक्सर((Anti-Vaxxer) असे नाव दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, व्हॅक्सिनमुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लोक संसर्ग झालेल्यांसोबत पार्टी करत आहे जेणेकरून त्यांनाही कोरोनाचा संर्सग होईल. त्यासाठी ते संसर्गित लोकांना मोठी रक्कम देखील देत आहे.

इटली सरकाने आदेश जाहिर केला आहे की १ फेब्रुवारी २०२२मध्ये ४० वर्ष पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी लसीकरण अनिवार्य आहे. अशामध्ये जर कोणी लस घेतली नाही तर त्याला दंड भरावा लागू शकतो तसेच नोकरीअसेल तर त्यांची नोकरी जाऊ शकते.

हेही वाचा: ओमीक्रॉनची लागण झालेल्यांना होतायेत पोटासंबधित त्रास

इटलीमध्ये कोरोना संक्रमणासंबधित जनादेशती घोषण केल्यानंतर संसर्ग झाल्यानंतर उठणे, बसणे, पार्टी सुरू केली आहे. अशामुळे जे लोक कोरोना संक्रमित होऊ इच्छित आहे त्यांना ते बरे होती असे वाटते

इटली पोलिसांनी एका अॅन्टी व्हॅक्सरने ऑनलाईन पोस्ट करत लिहले आहे की, मी सध्या एका संसर्गित व्यक्तीच्या शोधात आहे. त्यासाठी दंड भरण्याची माझी तयारी आहे.''

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, असे वागणाऱ्या लोकांना आणि पार्टीमध्ये जाणाऱ्या लोकांना अटक केली पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top