अबब... इटलीत एका दिवसात 627 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा....

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे इटलीतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक भागांमध्ये भीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोक पुढे येईनासे झाले आहेत. देशातील नागरिकांभोवतीचा या विषाणूंचा फास आणखी आवळल्या गेला असून रस्ते, चौक, रेस्टॉरंट ओस पडले आहेत.

मिलान : कोरोना विषाणू संसर्गाची सर्वाधिक झळ बसलेल्या इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या संख्येत इटलीने चीनला मागे टाकले आहे. आतापर्यंत इटलीमध्ये कोरोनामुळे 4032 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे इटलीतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक भागांमध्ये भीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोक पुढे येईनासे झाले आहेत. देशातील नागरिकांभोवतीचा या विषाणूंचा फास आणखी आवळल्या गेला असून रस्ते, चौक, रेस्टॉरंट ओस पडले आहेत. रोमपासून नेपल्सपर्यंत आणि व्हेनिसपासून फ्लोरेन्सपर्यंत सर्व लोकांनी आता स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतले आहे. स्थानिक प्रशासनानेही आवश्‍यकता असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. 

इटलीतील ज्या कोडोग्नो शहरातून या विषाणूचा संसर्ग सुरू झाला तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इटलीमध्ये सध्या पूर्णपणे टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून आवश्‍यक कामांसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पब, रेस्टॉरंट, ब्युटी सेंटर, हॉटेल आणि कँटिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आयटी कंपन्यांनीही सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 47 हजार जणांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. CoronaVirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Italy coronavirus lockdown as 627 people die in 24 hours

टॅग्स
टॉपिकस