बुरखा घातल्यास लाखोंचा दंड, इटलीत मेलोनी सरकारने आणलं विधेयक; मशिदींनाही कठोर नियम

इटलीत मेलोनी सरकारने सार्वजनिक ठिकाणी कपड्यांबाबत नवं विधेयक सादर केलंय. याशिवाय विधेयकात मशिदींसह मुस्लिम संस्थाना मिळणाऱ्या निधीबाबतही कठोर नियमांची तरतूद करण्यात आलीय.
Meloni Government Drafts Bill Restricting Burqa Use and Mosque Regulations in Italy

Meloni Government Drafts Bill Restricting Burqa Use and Mosque Regulations in Italy

Esakal

Updated on

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटलीने संसदेत एक वादग्रस्त असं विधेयक सादर केलंय. देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि निकाबसारख्या चेहरा झाकणाऱ्या वस्त्रांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे. मुस्लिम फुटीरतावाद आणि कल्चरल आयसोलेशन रोखण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलंय. या निर्णयाला मेलोनी यांच्या सरकारनं धार्मिक कट्टरतेशी जोडलंय. विधेयकानुसार नियमांचं उल्लंघन केल्यास ३०० ते ३ हजार युरो (२६ हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत) दंड ठोठावला जाऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com