350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष

टीम ई-सकाळ
Wednesday, 13 January 2021

गेल्या वर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळं इटली संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला होता. युरोपमध्ये काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव आहे. अशात इटली वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय.

रोम (Ndrangheta Mafia Italy) : एक-दोन नव्हे तर, 350 आरोपी. त्यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांचाही समावेश. एकूण साक्षीदार जवळपास 900. इटलीतील नव्हे तर, बहुदा जगातील सर्वांत मोठा खटला असलेल्या इटलीतील नड्रंघेता माफिया केसकडं (Ndrangheta Mafia Cas) संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. एक हजार आरोपी उपस्थित राहतील अशा कोर्ट रूमची उभारणी करण्यात आलीय तर, आरोपींसाठी विशेष कोठड्याही तयार करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा - धनंजय मुंडे यांची खुर्ची धोक्यात? आमदारकी राहणार की जाणार?

माफियाची 150 वर्षे
गेल्या वर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळं इटली संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला होता. युरोपमध्ये काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव आहे. अशात इटली वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. बेकायदेशी कामं केलेल्या नड्रंघेता या माफिया संघटनेच्या विरुद्ध सुरू असलेला खटला जगभरात चर्चेत आहे. जवळपास 150 वर्षांहून अधिक काळ ही माफिया संघटना काम करत होती. या संघटनेला नव्या कायद्यानुसार 2010मध्ये माफिया घोषित करण्यात आलं होतं.

काय केलं माफियाने?
इटलीमध्ये 1861पासून दहशत माजवत असलेल्या नड्रंघेता माफिया चर्चेत आला 1980-90च्या दशकात. त्यावेळी इटलीत मोठ्या प्रमाणावर अपहरणाच्या घटना वाढल्या होत्या. तेल व्यापारी जॉन पॉल गेटीच्या नातवाची हत्या केल्याचा आरोपही या संघटनेवर करण्यात आला आहे. यासह, अमली पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली, हवालाचे व्यवहार, कचऱ्याची बेकायदा तस्करी असे अनेक आरोप या माफिया संघटनेवर आहेत. 1950नंतर इटलीत अनेक लहान मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप संघटनेवर आहे.

आणखी वाचा - काय घडलं दिवसभरात? महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

कोण होते साथीदार?
इटलीत दहशत पसरवणाऱ्या या माफिया संघटनेशी पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी, नेते मंडळी यांनीही हात मिळवले होते. त्यामुळे खटल्यातील 350 आरोपींमध्ये पोलिस अधिकारी आणि नेत्यांचाही समावेश आहे. या आरोपींमधील काहींनी इटलीतून पळ काढला असून, जर्मनी, स्वित्झर्लंड, बल्गेरियामध्ये आश्रय घेतला आहे. ही माफिया संघटना केवळ इटलीतील नव्हे तर, जगातील सर्वांत श्रीमंत संघटना म्हणून ओळखली जात होती.

कसे चालायचे काम?
जगातील सर्वांत मोठी माफिया संघटना असली तरी, त्यांचे एक असे केंद्र स्थान नव्हते. संघटनेतील माफिया हे त्यांच्या त्यांच्या गावातूनच काम करायचे. पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांनी घरांच्या तळात बंकर तयार केले होते. अनेकदा महिना महिनाभर ते त्या बंकरमध्ये लपलेले असायचे. तसेच जंगलातही त्यांच्या लपण्याची व्यवस्था केली जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Italy Ndrangheta Mafia group trial hearing