इव्हांका आणि जावयाच्या वागण्याचा ट्रम्प यांच्या नातवंडांना फटका; शाळेतून काढून घेण्याची वेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

कोरोना निर्बंध झुगारण्याचा फटका अध्यक्षीय निवडणूकीत बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नातवांना शाळेतून काढून घ्यावे लागले.

वॉशिंग्टन- कोरोना निर्बंध झुगारण्याचा फटका अध्यक्षीय निवडणूकीत बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नातवांना शाळेतून काढून घ्यावे लागले. मुलगी इव्हांका आणि जावई जॅरेड कुशनर यांना तीन मूलांच्या बाबतीत हा कटू निर्णय घ्यावा लागला. हे दोघे कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर व्यवस्थापनाने इव्हांका-जॅरेड यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. अल्पवयीन मूलांची सुरक्षितता आणि खासगीपणाबद्दल चिंता निर्माण झाल्यामुळे शाळेने कार्यवाही केली. सीएनएन वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. 

शाळा प्रशासनाने सांगितले की, इव्हांका ट्रम्प आणि पती जेरेड कुशनर यांनी वारंवार कोरोनासंबंधी निर्बंधाचे उल्लंघन केले. या दोन्ही पती-पत्नींनी शाळा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांना अनेकदा धुडकावून लावले. पालकांकडून आलेल्या तक्रारी गांभीर्याने घेत शाळेने इव्हांका आणि जेरेड यांना समन्स दिला. त्यानंतर पती-पत्नींनी आपल्या तीन मुलांना शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला. मुले गेल्या तीन वर्षांपासून वॉशिंग्टनमधील पॉश स्कूलमध्ये शिकत होते.  

कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक आई-वडिलांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती की, इव्हांका आणि जेरेड पॅरेंट्स हेडबुकमधील नियमांचे पालन करत नाही. त्यानंतर शाळा प्रशासनाने याबाबतची चिंता इव्हांका आणि जेरेड यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतर या दोघांनी नाईलाजाणे आपल्या मुलांना शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातले आहे.

पालकांनी अशीही तक्रार केली होती की, सुप्रिम कोर्टाच्या घटनेनंतर तीन दिवसांनी इवांका ट्रम्प यांनी आपल्या पूर्ण परिवारासोबत आणि वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये भाग घेतला होता. या दरम्यान त्यांनी मास्क घातला नव्हता. सुप्रिम कोर्टाच्या घटनेमध्ये 13 लोक आजारी पडले होते. या घटनेनंतर इव्हांका आणि जेरेड 2 आठवड्यांसाठी विलगीकरणात राहिले नव्हते. शिवाय डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढलल्यानंतरही इव्हांका यांनी स्वत:ला विलगिकरणात ठेवले नव्हते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ivanka and Jered behavior hit Trump grandchildren Time to drop out of school