esakal | कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

covid test

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबरपासून रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी दिवाळीनंतर तो वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबरपासून रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी दिवाळीनंतर तो वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनावर आतापर्यंत अनेक संशोधने झाली आहेत. त्यामध्ये कोरोनाची लक्षणे, कोरोनामुळे शरीरावर होणारे परिणाम, कोरोनानंतर होणारा त्रास इत्यादी गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. देशातच याबाबत संशोधन झालं असून हरियाणातील आरोग्य विभागाने याबाबत खुलासा केला आहे. 

हरियाणाच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या महामारीची वेगवेगळी माहिती एकत्र केली आहे. यामधून असा निष्कर्ष समोर आला की, कोरोनाचा विषाणू पहिल्यांदा रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा फुफ्फुसाला असतो. रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन श्वास घेण्यासाठी त्रास होतो. या त्रासामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते असंही संशोधनातून समोर आलं आहे. 

हे वाचा - अभिमानास्पद! जगभरातील टॉप वैज्ञानिकांच्या यादीत 36 भारतीय

याबाबत डॉक्टर राजेंद्र राय यांनी सांगितलं की, कोरोना झालेल्या रुग्णांची तपासणी झाल्यानंतर सीटीस्कॅन करण्यात आले. त्यात असं दिसलं की, 75 टक्क्यांपर्यंत संसर्ग फुफ्फुसात पसरला असेल तर रुग्णाला वाचवता येतं. पण त्यापेक्षा जास्त संसर्ग झाला असेल तर रुग्णाला वाचवण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असतं.

भारतात गेल्या 24 तासांमध्ये 45 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संक्या 88 लाखांवर पोहोचली आहे. तर 500 हून अधिक जणांचा गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू जाला आहे. सध्या देशात जवळपास 5 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

loading image
go to top