ऑनलाईन विक्रीचा शहेनशहा घेणार निवृत्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

1999 मध्ये अलिबाबाची स्थापना झाली, त्यापूर्वी मी एका विद्यापीठात इंग्रजीचा शिक्षक होतो. अलिबाबासाठी मी 60 हजार डॉलर्सचे कर्ज घेतले होते. अलिबाबामुळे मी ऑनलाईन जगात यशस्वी व्यवसाय केला. 'कंपनीतून बाहेर पडून वेगळं काहीतरी करून दाखवणे ही माझ्यासाठी नवीन सुरवात असेल,' असे मत मा यांनी व्यक्त केले. 

सॅन फ्रॅन्सिस्को : चीनमधील 'अलिबाबा' या सुप्रसिद्ध ऑनलाईन कंपनीचे सहसंस्थापक जॅक मा यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी (ता. 10) आपल्या पदाचा राजीनामा देतील. पुढील आयुष्य शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी व्यतीत करणार असल्याची भावना त्यांनी व व्यक्त केली व यासाठीच कंपनीच्या कामकाजातून रजा घेत असल्याचे मा यांनी जाहीर केले. 

1999 मध्ये अलिबाबाची स्थापना झाली, त्यापूर्वी मी एका विद्यापीठात इंग्रजीचा शिक्षक होतो. अलिबाबासाठी मी 60 हजार डॉलर्सचे कर्ज घेतले होते. अलिबाबामुळे मी ऑनलाईन जगात यशस्वी व्यवसाय केला. 'कंपनीतून बाहेर पडून वेगळं काहीतरी करून दाखवणे ही माझ्यासाठी नवीन सुरवात असेल,' असे मत मा यांनी व्यक्त केले. 

मा यांचा जन्म अगदी सामान्य घरात झाला. इंटरनेटचे ज्ञान मिळाल्यानंतर ही गोष्ट चीनला व जगाला बदलवू शकते अशी जाणीव मा यांना झाली. तसेच ऑनलाईन शॉपिंगचे महत्त्व मा यांनी ओळखले होते. आता अलिबाबाची किंमत साधारण 420.8 अरब डॉलर (30,284 अरब रुपये) इतकी आहे. तसेच जगातील सर्वातील श्रीमंत व्यक्तिंमध्ये त्यांची गणना होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jack ma declare retirement from alibaba e commerce company