जॅकी चॅनची लेस्बियन मुलगी झाली बेघर

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

शांघाय : जगभरात लोकप्रिय असलेला अभिनेता जॅकी चॅनची लेस्बियन मुलगी बेघर झाली असून, ती व तिच्या मैत्रिणीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. लेस्बियन असल्यामुळे माझ्या पालकांनी मला घरातून बाहेर काढले आहे, असा व्हिडिओ जॅकी चॅनची मुलगी एटा एनजी हिने सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केला आहे.

शांघाय : जगभरात लोकप्रिय असलेला अभिनेता जॅकी चॅनची लेस्बियन मुलगी बेघर झाली असून, ती व तिच्या मैत्रिणीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. लेस्बियन असल्यामुळे माझ्या पालकांनी मला घरातून बाहेर काढले आहे, असा व्हिडिओ जॅकी चॅनची मुलगी एटा एनजी हिने सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केला आहे.

एटा एनजी हिचा जन्म 1999 मध्ये झाला असून, 30 वर्षीय ऍण्डी औतुम्न हिच्यासोबत राहात आहे. दोघींचा एकत्रित असलेला व्हिडिओ तिने युट्यूबवर अपलोड केला आहे. त्यामध्ये आम्ही दोघी एक महिन्यापासून बेघर झाल्याचे म्हटले आहे. समलिंगी संबंधांचा तिरस्कार करणाऱ्या आई-वडिलांमुळे आम्ही एक महिन्यापासून बेघर आहोत. अनेक रात्री आम्ही पुलाच्या खाली आणि इतर ठिकाणी घालवल्या. आम्ही पोलिस, रुग्णालय, फूड बँक, एलजीबीटीक्यू समाजाकडे गेलो, पण कोणीही आमची मदत केली नाही. आता काय करायचं हे आम्हाला समजत नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे लोकांना समजावं एवढीच आमची इच्छा आहे. कारण कोणीच आम्हाला मदत करत नाही, हे फारच घृणास्पद आहे," असं एटा एनजीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

जॅकी चॅनने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु, एटा समलिंगी असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला आहे. जॅकी चॅन आणि माजी ब्युटी क्वीन एलायने एनजी यांची एटा ही मुलगी आहे. पण जॅकीने एलायनेसोबत लग्न केले नाही. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. जॅकी चॅनने जोआन लिनसोबत विवाह केला आहे.

एलायनेने व्हिडीओ बनवण्यापेक्षा काहीतरी काम शोधा, असा सल्ला या दोघींना दिला आहे. तुमच्याकडे पैसे नाहीतर तर काम शोधा. व्हिडीओ अपलोड करुन आपल्या परिस्थितीबाबत आणि आपले वडील कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. जगभरातील लोक कष्ट करुन खर्च करतात. इतरांच्या प्रसिद्धीचा फायदा घेणे चुकीचे आहे, असे एटाच्या आईने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jackie Chans lesbian daughter posts video saying she and her girlfriend are homeless