esakal | जेकब झुमा, दक्षिण आफ्रिका व भारतीय
sakal

बोलून बातमी शोधा

south africa

दक्षिण आफ्रिकेचे माजी वादग्रस्त अध्यक्ष जेकब झुमा यांना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या आठवड्यात घटनात्मक न्यायालयाने पंधरा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. सुरूवातीस तो निकाल झुमा यांनी धुडकावून लावला.

जेकब झुमा, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय

sakal_logo
By
- विजय नाईक

दक्षिण आफ्रिकेचे माजी वादग्रस्त अध्यक्ष जेकब झुमा यांना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या आठवड्यात घटनात्मक न्यायालयाने पंधरा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. सुरूवातीस तो निकाल झुमा यांनी धुडकावून लावला. समन्स मिळूनही न्यायालयात उपस्थित होण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला. परिस्थिती चिघळू लागली, तसे त्यांनी तुरुंगात जाण्याचे ठरविले. परंतु तत्पूर्वी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे आपल्या समर्थकांना अप्रत्यक्षरित्या चिथावण्यास ते विसरले नाही. त्यामुळे, उसळलेल्या हिसांचाराने क्वाझुलू नाताळ प्रांतात हिंसाचार उफाळून आला असून, त्यात सत्तरापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. सुमारे दोनशे मॉल्सची लूटलूट होऊन लाखो रँड्सचा माल पळविण्यात आला. लूटमार करण्यासाठी मॉल्सबाहेर आलेल्या काही ट्रक्सवर झुमांचे नाव लिहिलेले होते. त्याचा आखोदेखा हाल दृकश्राव्य माध्यमांनी टिपल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत अस्थिरता निर्माण झाली असून, सत्तेवर आल्यापासून अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्यापुढे कायदा व सुरक्षेचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्याचा फटका भारतीयांना बसला असून, महात्मा गांधी यांनी ज्या शहरात आश्रम बांधला होता, त्या फिनिक्स वसाहतीत तसेच, हौटेंग प्रांतात (जोहान्सबर्ग व नजिकचा प्रदेश) जाळपोळ, नासधूस झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत राहाणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अंदाजे तेरा लाख असून, त्यापैकी बव्हंशी भारतीय क्वाझुलू नाताळमध्ये राहतात.

तेथील ख्यातनाम विश्लेषक क्लेम सुंटर यांनी घटनांवर प्रकाशझोत टाकताना म्हटले आहे, की विद्यमान अध्यक्ष सिरिल रामफोसा यांचे सरकार उलथवून टाकण्याचा झुमा यांचा डाव होता. तो फसला आहे. झुमा यांना हवे होते, की आपण तुरूंगात गेल्यानंतर प्रचंड हिंसाचार होईल. लोकांवर सरकार बेछूट गोळीबार करील व त्यात असंख्य लोक ठार झाले, की रामफोसा यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागेल. सुदैवाने तसे झाले नाही. सुंटर काँग्रेसचे अध्यक्ष (एएनसी) झाले. पण, त्यांच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीत सरकारच्या व त्यांच्या वैयक्तिक भ्रष्टाचारानं शिखर गाठलं. त्यामुळे, पक्षांतर्गत झुमाविरोधी लाट उसळली व 18 सप्टेंबर 2017 रोजी सिरिल रामफोसा यांना एएनसीचे अध्यक्ष निवडण्यात आलं. ते सरळ स्वभावाचे पण, काटेकोर निर्णय घेणारे आहेत.

हेही वाचा: पुण्यातील IISERच्या लॅबमध्ये लागली आग; जीवितहानी नाही

`इंडो कॅरिबियन डॉट कॉम’ या संकेतस्थळावर महिला पत्रकार ज्युडिथ रघुनाथन यांनी ``फिनिक्समधील भारतीयांच्या साह्यासाठी जनतेनं पुढं आलं पाहिजे,’’ असं आवाहन केलं आहे. दंगा व लूटमार करणाऱ्या 1200 जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ऩॅशनल डिफेन्स फोर्सचे 25000 सशस्त्र पोलीस तैनात करण्याचे ठरले आहे. या सैनिकांनी 12 जुलै ते 12 ऑक्टोबर 2021 दरम्यान कशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्था संभाळायची, याची संहिताही जाहीर करण्यात आली. ``दंगलखोर व लुटालूट करणाऱ्यांवर कमी क्षमतेच्या रबर बुलेट्सचा वापर करा, पण गोळीबार टाळा,’’ असेही आदेश देण्यात आलेत.

क्वाझुलू नाताळचे पोलीस खात्याचे मंत्री भेकी सेले यांनी फिनिक्समध्ये पंधरा जण ठार झाल्याचे कबूल केले. ``भारतीय वशांच्या व्यावसायिकांनी स्वतःची दुकाने व अऩ्य ठिकाणे वाचविण्यासाठी तयार केलेल्या स्वयंसेवकांबरोबर दंगाखोरांच्या झालेल्या म्हणतात, 1994 च्या सार्वत्रिक निवडणुकांनतर 2008 पर्यंत देशाची मारामारीतून हे घडले,’’ असे ते म्हणाले. परंतु, त्यामागे वांशिक द्वेष होता, याचा मात्र इन्कार केला.

झुमा हे झुलू जमातीचे, टोळीचे नेते असून, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये त्यांचे स्थान मंडेला सत्तेवर आल्यापासून वाढू लागले. मंडेला सत्तेवर आले, तेव्हा, ते एएऩसीचे प्रांताध्यक्ष होते. क्वाझुलू नाताळमध्ये राजे गुडविल झ्वेलेथिनी व ज्य़ेष्ठनेते मांगोसुथू बुथलेझी यांच्या नेतृत्वाखालील इंकाथा फ्रीडम पार्टीने 1994 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लढविल्या. या पक्षाचा विरोधक असलेल्या एएऩसीलाही चांगल्या जागा मिळाल्या. त्याचे श्रेय झुमा यांना मिळाल्याने पक्षातील त्यांचे वजन वाढले. तथापि, उपराष्ट्राध्यक्ष असताना 1999 मध्ये त्यांनी केलेल्या शस्त्र खरेदीत 2 अब्ज डॉलर्सचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. झुमा यांच्यावर भारतातील सहाराणपूर येथून गेलेले उद्योगपती अजय, अतुल व राजेश या गुप्ताबंधूंचा इतका पगडा बसला, की त्यांच्या अनेक उद्योगांना झुमा यांनी दिलेल्या परवानग्या अखेर बेकायदेशीर ठरल्या. झुमा यांच्या सरकारची धोरणे गुप्ताबंधू आखत होते, असे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. गुप्ता यांच्या सरकारवरील मगरमिठीविरूद्ध खुदद सत्तारूढ पक्षातील नेते नाराज होते, तसेच इंकाथा फ्रीडम पक्षातील नेतेही नाराज होते.

हेही वाचा: महाराष्ट्रातील रुग्णवाढ देशासाठी चिंतेचा विषय- पंतप्रधान

आर्थिक प्रगती चांगली झाली. 2008 मध्ये झुमा आफ्रिकन नॅशनल दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातील आघाडीवरील प्रगत देश असल्याने काही वर्षांपासून तांझानिया, झांबिया, झिंबाबवे आदी देशातून असंख्य लोक तिथं नोकऱ्या व व्यवसाय शोधण्यासाठी येत आहेत. त्यातील अऩेक बेकायदेशीररित्या आले आहेत. त्यांनी उघडलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायांवर स्थानियांनी ह्ल्ले केले होते. सधन श्वेतवर्णीय व सधन भारतीयांनाही काहींनी लक्ष्य केले होते. झुमा यांच्या समर्थकांनी लावलेल्या फलकांवर ``झुमा यांना मुक्त करा, लूटमार बंद होईल,’’ असा इशारा दिला आहे. सत्तेत नसलो, तरी दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणावर आपलंच वर्चस्व हवं, यासाठी त्यांचे हे सारे प्रयत्न चालले आहेत. हिंसाचार, लूटमार थांबववी, असे कोणतेही आवाहन झुमा यांनी केलेले नाही. यावरून जे होतेय, त्याला त्यांचा मूक पाठिंबा आहे, हेच सिद्ध होते.

वसाहतवाद संपुष्टात येऊन दक्षिण आफ्रिकेत सत्तावीस वर्ष उलटलीत. प्रारंभी लोकप्रिय असलेल्या एएनसीची प्रतिमा झुमा यांच्या काळात घटली, ती रामफोसा अध्यक्ष झाल्याने सुधारली आहे. तथापि, झुमांचे कटकारस्थान सरकारला खिळखिळे करणार नाही, यासाठी रामफोसा यांना नेहमीच सावध राहावे लागेल

loading image