esakal | पुण्यातील IISERच्या लॅबमध्ये आग; जीवितहानी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील IISERच्या लॅबमध्ये लागली आग; जीवितहानी नाही

पुण्यातील IISERच्या लॅबमध्ये लागली आग; जीवितहानी नाही

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : देशातील नामांकित संशोधन संस्था असलेल्या पुण्यातील IISER मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. रसायनशास्र प्रयोगशाळेतील मायक्रोओव्हन पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याचे समजते. शुक्रवारी(ता.16) दुपारी ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग वाढली असून आता आगीचे लोट दिसत आहे.अग्निशमन दलाने अधिक कुमक मागवली आहे.

दरम्यान, या आगीच्या घटनेत दोन संशोधक विद्यार्थ्यांना भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दरम्यान, या आगीच्या घटनेत दोन संशोधक विद्यार्थ्यांना भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा: पुण्यात कोरोना निर्बंध 'जैसे थे'; अजित पवारांची माहिती

IISERमधील लॅबमध्ये सुरुवातीला आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या लॅबमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात धूर झाला असून आग लागल्याचे समजताच सर्व कर्मचारी इमारतीबाहेर पडले आहेत. रसायनशास्र प्रयोगशाळेला तीन मजले असून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा साठा आहे. सुरक्षेखातर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.

loading image