एकटेपणा दूर करण्यासाठी जपानमध्ये मंत्र्याची नियुक्ती; का उचलावं लागलं असं पाऊल?

lonliness
lonliness

टोकिओ- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती पाहायला मिळाली. या काळात अनेक देशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. कोरोना काळात जपानमध्ये आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. देशातील वाढत्या आत्महत्यांमुळे चिंतीत झालेल्या जपान सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललंय. सरकारने आता यासाठी  'Minister of Loneliness' मिनिस्‍टर ऑफ लोन्‍लीनेस म्हणजे एकटेपणा दूर करण्यासाठी असलेल्या मंत्र्याची नियुक्ती केलीये. महामारीच्या काळात म्हणजे 2020 जपानमध्ये 11 वर्षानंतर एकटेपणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे जपानला हा निर्णय घ्यावा लागला. 

द जपान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटेनचे अनुकरण करत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कॅबिनेटमध्ये मिनिस्‍टर ऑफ लोन्‍लीनेसचे पद जोडलंय. ब्रिटेन 2018 मध्ये अशाच प्रकायचं एक पद तयार करुन जगातील पहिला देश बनला होता. 

सुगा यांनी मंत्री तात्सुशी सकामोतो यांना ही जबाबदारी दिलीये. साकामोतो यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, पंतप्रधानांनी हा राष्ट्रीय मुद्दा मानला असून याचे निराकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलीये. या प्रकरणी एक व्यापक रणनीती तयार केली जाईल. मला आशा आहे की, सामाजिक एकटेपण रोखण्यासाठी आणि लोकांमधील संबंध वाचवण्यासाठी काही ठोस योजना आखल्या जातील. 

सीएनएनने सांगितलं की, जपान सरकारने कोरोना महामारीच्या काळात वाढलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारीला कॅबिनेटमध्ये 'एकटेपण कार्यालय' बनवले आहे. जपानमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काही काळासाठी देशात अनेक निर्बंध लादण्यात आले होते. जपानमध्ये 4 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढलले आहेत, तसेच 7,577 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

काय आहे कारण?

एकटेपणा आणि सामाजिक सहभागाचा अभाव वाढत्या आत्महत्यांमागचं कारण आहे. कोरोना महामारीने हे संकट अधिक गडद केलंय. 2020 मध्ये कोरोना महामारीवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे एकमेकांना भेटण्यावर बंधनं आली. तसेच सोशल गँदरिंगला बंदी घालण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये एकटेपणा वाढला. अनेक लोक नैराशात लोटले गेले. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांमध्ये ही समस्या जाणवली. अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकटेपणाची भावना वाढल्याचं सांगितलं जातं.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com