esakal | कमी अंतरावर धावणाऱ्या रेल्वेच्या भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांमध्ये रोष

बोलून बातमी शोधा

railway}

रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे.

कमी अंतरावर धावणाऱ्या रेल्वेच्या भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांमध्ये रोष
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे. त्यामुळे आता अमृतसर ते पठाणकोटचे भाडे 25 रुपयांवरुन 55 रुपये झाले आहे. यावरुन रोष व्यक्त झाल्यानंतर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय. मंत्रालयाने म्हटलं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक फेऱ्यांमध्ये घट करण्यासाठी भाडे किंचित वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकल रेल्वेंचे भाडे इतक्याच अंतराच्या मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंच्या अनारक्षित तिकिटांऐवढे केले गेले आहे. अशा रेल्वेंची संख्या कमी आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे सुरु करण्यात आलेल्या नाहीत. हळूहळू त्या सुरु केल्या जात आहेत. कोरोना काळात रेल्वे सेवा बंद झाल्याने मोठा फटका सहन करावा लागला आहे. 

केरळमधील वक्तव्याप्रकरणी कपिल सिब्बलांचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले...

कानपूर आणि फैजाबादसाठी पॅसेंजर रेल्वेचे भाडे वाढले

कानपूर आणि फैजाबादसाठी सोमवारपासून सुरु करण्यात आलेल्या पॅसेंजर रेल्वेच्या प्रवाशांनी वाढवण्यात आलेल्या भाड्याच्या मुद्द्यावरुन चारबाग रेल्वे स्टेशनवर जोरदार गोंधळ केला होता. प्रवाशांचं म्हणणं होतं की, रेल्वेने अशा कोणत्या सुविधा वाढवल्या आहेत ज्यामुळे भाडे 20 रुपयांवरुन थेट 45 रुपये करण्यात आले. तसेच आरोप करण्यात आला की, एमएसटी धारकांना प्रवासाची सुविधा न देण्यावरुन सिद्ध होतंय की रेल्वे प्रशासनाला फक्त वसुली करायची आहे. रेल्वे प्रशासन पॅसेंजर रेल्वेंना मेल-एक्सप्रेसच्या धर्तीवर चालवत आहे. त्यामुळेही रेल्वेचे भाडे वाढवले जात आहे. 

शिक्षण घेताना आपल्या उपयोगी येऊ शकतात केंद्र सरकारच्या या पाच शिष्यवृत्ती !...

कुरुक्षेत्र-निजामुद्दीन पॅसेंजर रेल्वे

कोरोना महामारीमुळे बंद असलेली कुरुश्रेत्र-निजामुद्दीन पॅसेंजर रेल्वे सोमवारपासून सुरु करण्यात आली. त्यामुळे पानीपतमधून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला, पण पानीपत ते दिल्लीचे भाडे रेल्वेने दुप्पट केले. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. पहिल्या दिवशी रेल्वेला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येत्या काळात रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र, वाढलेल्या रेल्वे प्रवाशाच्या भाड्यामुळे प्रवाशी याकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.