रासायनिक हल्लाप्रकरणी जपानमध्ये 7 जणांना मृत्युदंड

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

शोको असाहारा या नावेनेही चिझुओ ओळखला जात असे. त्याला आज सकाळी फासावर लटकविण्यात आले. त्यानंतर इतर सहा जणांना क्रमाक्रमाने फाशी देण्यात आल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी केली. 

टोकिओ : ओम सुप्रिम पंथाचा नेता आणि इतर सहा जणांना जपानमध्ये आज मृत्युदंड देण्यात आला. 1995 मध्ये टोकिओतील सब-वेमध्ये रेल्वे गाडीमध्ये विषारी रासायनिक वायूचा वापर करून करण्यात आलेल्या हल्ल्यात 13 जण मृत्युमुखी पडले होते. ओम सुप्रिम पंथाच्या सदस्यांनी हा हल्ला केला होता, या हल्ल्यामुळे संपूर्ण जपान हादरले होते. 

जर्मनीतील नाझी सैनिकांनी बनविलेल्या या रासायनिक वायूचा वापर टोकियोतील सब-वेमधील रेल्वेगाडीतील हल्ल्यात करण्यात आला होता. या हल्ल्यात 13 जण मृत्युमुखी पडले होते, सुमारे पाच हजार 800 जणांना कायमस्वरूपी इजा पोचविली होती. चिझुओ मात्सुमोटो असे ओम सुप्रिम पंथाच्या प्रमुखाचे नाव असून, काधी काळी सुमारे दहा हजार जण त्याचे शिष्य बनले होते. 

शोको असाहारा या नावेनेही चिझुओ ओळखला जात असे. त्याला आज सकाळी फासावर लटकविण्यात आले. त्यानंतर इतर सहा जणांना क्रमाक्रमाने फाशी देण्यात आल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी केली. 

Web Title: In Japan chemical attack 7 people punishment