Japan Dating App: खतरनाक! जपान सुरू करणार सरकारी Dating App; काय आहे इतक्या मोठ्या निर्णयामागे कारण?

Tokyo Futari Story: जपानची सरकारी संस्था टोकियो सिटी हॉल "टोकियो फुटारी स्टोरी" नावाचे असे Dating App सुरू करत आहे. "टोक्यो फुटारी स्टोरी" म्हणजे दोन लोकांची गोष्ट.
Japan Dating App|Tokyo Futari Story
Japan Dating App|Tokyo Futari StoryEsakal

जपानमधील टोकियो प्रशासनाने देशाच्या घटत्या जन्मदराला तोंड देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. येथे सरकार लवकरच एक डेटिंग ॲप लॉन्च करणार आहे. ज्यामुळे देशाचा जन्मदर वाढण्यास मदत होईल.

जपानची सरकारी संस्था टोकियो सिटी हॉल "टोकियो फुटारी स्टोरी" नावाचे असे Dating App सुरू करत आहे. "टोक्यो फुटारी स्टोरी" म्हणजे दोन लोकांची गोष्ट. (Tokyo Futari Story)

जपानमधील विवाहाचे घटते प्रमाण लक्षात घेऊन हे पाऊल उचलले जात आहे. एवढेच नाही तर जपानमधील जन्मदर झपाट्याने कमी होत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी देशातील ही परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले आहे.

डेटिंग ॲप्ससाठी 300 दशलक्ष येन

एका मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय जन्मदर वाढवण्यासाठी जपान लवकरात लवकर स्वतःचे डेटिंग ॲप लॉन्च करेल. एका अधिकाऱ्याने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की युजर्स ते कायदेशीररित्या अविवाहित असल्याचे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याला लग्नासाठी तयार असल्याच्या पत्रावरही सही करावी लागणार आहे. यासह नागरिकांना जपानी डेटिंग ॲप्सवर त्यांचे उत्पन्न जाहीर करणे बंधनकारक असेल. लोकांना त्यांचे वार्षिक वेतन सिद्ध करण्यासाठी कर प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे.

दरम्यान जपानच्या प्रशासनाने 2023 च्या बजेटमध्ये 200 दशलक्ष येन आणि 2024 च्या आर्थिक बजेटमध्ये 300 दशलक्ष येन ॲप्स आणि इतर प्रकल्पांद्वारे विवाहाला चालना देण्यासाठी दिले आहेत.

Japan Dating App|Tokyo Futari Story
Boeing Starliner : सुनीता विलियम्सची Starliner अंतराळ मोहीम एवढी महत्वाची का? जाणून घ्या कारण

पारंपारिक विवाहांमध्ये लोकांचा रस कमी

सध्या, जपानमधील विवाह दर आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 504,930 विवाह झाले. 2023 मध्ये, विवाहांची ही संख्या 474,717 पर्यंत घटली आहे.

त्याचप्रमाणे, जन्मदर देखील याच कालावधीत 770759 वरून 727277 वर घसरला आहे. जपानमधील या समस्येसाठी कामाचे जास्त तास आणि पारंपारिक विवाहांमध्ये लोकांचा कमी रस यासारखे अनेक घटक कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे..

Japan Dating App|Tokyo Futari Story
Viral Video: आशियातील सर्वात उंच धबधबा आहे ड्यूप्लिकेट? चीनी पर्यटकाने असा लावला शोध, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

मूल जन्माला घाला अन् सहा लाख मिळवा!

लग्नाला अनेक वर्षे झाल्यानंतरही जपानमध्ये बहुतांश लोकांना मूल होत नाही. त्यामुळे जपानमध्ये तरुणांची संख्या सातत्याने कमी होत आहे, तर वृद्धांची संख्या वाढत आहे. आता जपानमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. घटत्या लोकसंख्येमुळे हा देश त्रस्त आहे.

जपान टाइम्सच्या अहवालानुसार, जपानी लोकांवर केलेल्या एका नवीन सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 70 टक्के अविवाहित पुरुष आणि 60 टक्के अविवाहित महिलांना 18 ते 34 वयोगटातील संबंधांमध्ये रस नाही.

30 टक्के अशी जोडपी देखील आहेत ज्यांना लग्नाला अनेक वर्षे उलटूनही मुले होत नाहीत. यामुळे येथील सरकार मुले जन्माला घालण्यासाठी रोख बक्षीस देते. आता प्रत्येक मुलाला 6 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. जपानमध्ये जन्मदर केवळ 1.46 आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com