धक्कादायक! शौचालयातील पाण्याचा 30 वर्षांपासून पिण्यासाठी वापर

Japan Hospital
Japan Hospitalesakal
Summary

शौचालयासाठी प्रक्रिया केलेलं पाणी जवळपास 30 वर्षे पिण्याचं पाणी म्हणून वापरलं गेलंय.

जपानमध्ये (Japan) एक विचित्र घटना समोर आलीय. योमिउरी शिम्बुनच्या (Yomiuri Shimbun) अहवालानुसार, जपानमधील एका रुग्णालयानं चुकीनं शौचालयासाठी प्रक्रिया केलेलं पाणी जवळपास 30 वर्षे पिण्याचं पाणी म्हणून वापरलंय. ही विचित्र घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. त्यानंतर ओसाका विद्यापीठाचे (Osaka University) संशोधक आणि रुग्णालयाचे उपाध्यक्ष काजुहिको नकातानी (Kazuhiko Nakatani) यांनी माफीही मागितली होती. जपानी न्यूज आउटलेट्सनुसार, रुग्णालय ओसाका विद्यापीठात आहे. ही रुग्णालयाची इमारत मेडिसिन फॅकल्टीशी संलग्न आहे.

आश्चर्य म्हणजे, हे पाणी 120 नळांपर्यंत पोहोचलं होतं. याचा पिण्याचे पाणी, हात धुण्यासाठी वापर केला जात होता. 1993 मध्ये जेव्हा हॉस्पिटल बांधलं गेलं, तेव्हा पाइपच्या जोडणीमध्ये बिघाड झाल्यानं समस्या निर्माण झाली होती. जपानी मीडिया आउटलेटनं वृत्त दिलं, की हॉस्पिटल व्यवस्थापनानं नवीन जल प्रक्रिया प्रकल्पाचं बांधकाम सुरू केलं, तेव्हा ही घटना उघडकीस आली. आजपर्यंत या प्रश्नाकडं कोणीही लक्ष दिलं नाही आणि कोणाला याची माहितीही नव्हती. नवीन प्लांटच्या बांधकामादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत या घटनेची माहिती समोर आलीय.

Japan Hospital
इंडो-पॅसिफिक महासागरातून चीन अमेरिकेला करणार उद्धवस्त?

सध्या विद्यापीठ या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यात म्हटलंय, की पाण्याची गुणवत्ता सतत तपासली जात आहे. आतापर्यंत कोणतेही घातक पदार्थ ओळखले गेले नाहीत. 2014 पासून दर आठवड्याला पाण्याची रंग, चव आणि गंध तपासण्याबाबतच्या नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, त्यानंतर कोणतीही अडचण आली नाही. नकातानी नुकतीच पत्रकार परिषदेत याप्रकरणी माफी मागितलीय. अहवालानुसार नकातानी म्हणाले, प्रगत वैद्यकीय सेवा देणाऱ्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाण्याबाबत लोकांमध्ये चिंता निर्माण झालीय, याचे मला खूप वाईट वाटते. या कॉम्प्लेक्समध्ये 100 हून अधिक इमारती आहेत, ज्यात विहीर पाण्याचा वापर सोप्या पद्धतीनं केला जातो. दरम्यान, जपानमध्ये असा निष्काळजीपणा समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

Japan Hospital
एकमेकांना शेण मारुन 'या' शहरात साजरा करतात एक विचित्र 'सण'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com