
Japan PM resigns breaking news resignation to stop party division
Esakal
जपानमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पक्ष फुटण्यापासून रोखण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय़ घेतलाय. सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीत बंडखोरी रोखण्यासाठी पंतप्रधान राजीनामा देणार आहेत. शिगेरू इशेबा पत्रकार परिषद घेणार असून त्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जगातल्या सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणाऱ्या जपानमध्ये पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडालीय.