esakal | जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचा Re-Election न लढण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचा Re-Election न लढण्याचा निर्णय

एक वर्षापूर्वी शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानतंर सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती.

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचा Re-Election न लढण्याचा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टोकियो - जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी म्हटलं की, ते सत्तारुढ पक्षाचे नेते म्हणून सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या Re-Election मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. याचाच अर्थ असा की जपानचे पंतप्रधान म्हणून योशिहिदे सुगा हे राजीनामा देऊ शकतात. एक वर्षापूर्वी शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानतंर सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती.

सुगा यांनी शुक्रवारी त्यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की,'मी पक्षाचे नेतृत्व निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही.' यासाठी २९ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. सुगा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानं आाता जपानला नवं नेतृत्व मिळणार आहे. एलडीपीच्या प्रमुखाची निवड झाल्यानंतर पुढची प्रकिया पार पडेल. एलडीपीला संसदेत बहुमत असून त्यांच्या नेत्याचीच निवड जपानच्या पंतप्रधानपदी होईल.

कोरोनाच्या संकटात वेगाने हालचाली न केल्यानं आणि आरोग्याचे प्रश्न असतानासुद्धा ऑलिम्पिकच्या आय़ोजनावरून योशिहिदे सुगा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. जपानमध्ये सध्या आणीबाणी लागू आहे. देशात १५ लाखांहून जास्त लोक कोरोनाबाधित असून लसीकरणाचा वेगही कमी आहे. कोरोनाने परिस्थिती बिघडल्यानंतरही ऑलिम्पिकचे आयोजन केल्यानं त्यांनी नाराजी ओढवून घेतली.

हेही वाचा: भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर ठरली खरी - PM मोदी

सध्या योशिहिदे सुगा यांचे वय ७२ वर्षे असून पहिल्यांदा १९८७ मध्ये योगोहामाचे सिटी काउन्सिल म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर १९९६ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. २००५ मध्ये पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांच्या कार्यकाळात त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते.

loading image
go to top