esakal | भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर खरी; PM मोदींकडून पुतिन यांचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर 
ठरली खरी - PM मोदी

इस्टर्न इकॉनॉमिक फोरमची बैठक रशियात सुरु असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली सहभागी झाले आहेत.

भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर ठरली खरी - PM मोदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्टर्न इकॉनॉमिक फोरमची बैठक रशियात सुरु असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली सहभागी झाले आहेत. आर्थिक हालचाली वेगवान करण्यासाठी घेण्यात येणारी ही सहावी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माधम्यातून होत आहे. यामध्ये भारताशिवाय चीन, अर्जेंटिना, थायलंडचे नेते सहभागी झाले आहेत. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमि पुतिन, कझाकीस्तान आणि मंगोलियाचे राष्ट्रपतीसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी हे रशियात आहेत.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, माझ्या दृष्टीकोनातून व्लादिवोस्तोक खरंतर युरेशिया आणि प्रशांत महासागराचा 'संगम' आहे. तसंच रशियाच्या विकासासाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या दृष्टीकोनाचे कौतुक करावे वाटते. तसंच त्यांच्यासोबत हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी भारत रशियाचा एक विश्वासू सहकारी असेल. मला इस्टर्न फोरमला संबोधित करताना आनंद होत आहे आणि या गौरवासाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभारही मानतो. भारताच्या इतिहासात आणि सभ्यतेमध्ये 'संगम'चा खास अर्थ आहे. याचा अर्थ नदी, लोक, विचार यांचा संगम किंवा एकत्र येणं असा आहे.

भारत आणि रशियाच्या मैत्रीचा दाखला देताना मोदी म्हणाले की, भारत आणि रशिया यांची मैत्री काळाच्या कसोटीवर खरी ठरली आहे. कोरोनाच्या महामारीवेळी आपल्यामध्ये चांगले सहकार्य दिसून आले. यात लशीच्या क्षेत्राचा समावेश आहे. महामारीने दोन्ही देशांच्या सहकार्याने आरोग्य आणि फार्मा क्षेत्रातील महत्त्व उजेडात आले.

हेही वाचा: मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख

२०१५ पासून दरवर्षी EEF बैठक होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. या वर्षी २ ते ४ सप्टेंबर दरम्यान व्लादिवोस्तोकमध्ये ही बैठक होत आहे. यात इतर देशांचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. या बैठकीचा उद्देश व्यापारी संबंध विकसित करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा आहे. या बैठकीत ५१ देशांचे प्रतिनिधीत्व करणारे ३ हजारहून जण सहभागी झाले आहेत. यावेळी जागतिक बदलांमध्ये Far East साठी संधी असा बैठकीचा विषय आहे.

loading image
go to top