कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'या' देशाने हटवली आपत्कालीन आणीबाणी

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मे 2020

चीन मधून सर्व जगभर पसरलेल्या या विषाणूमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण असून, पुन्हा विखुरलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत दक्षिण कोरिया व काही प्रमाणात जर्मनी हे ठराविक देश सोडल्यास कोणालाच परिस्थिती नियंत्रणात आणता आलेले नाही.    

टोकियो : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील आपत्कालीन आणीबाणी हटविली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ७ एप्रिल रोजी जपानच्या काही प्रातांमध्ये आपत्कालीन आणीबाणी लागू करण्यात आली होती. चीन मधून सर्व जगभर पसरलेल्या या विषाणूमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण असून, पुन्हा विखुरलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत दक्षिण कोरिया व काही प्रमाणात जर्मनी हे ठराविक देश सोडल्यास कोणालाच परिस्थिती नियंत्रणात आणता आलेले नाही.       

गुजरात म्हणजे बुडणारं जहाज; उच्च न्यायालयाचे ताशेरे

चीनच्या वुहान शहरातून जगभरात वेगाने संक्रमण करणाऱ्या कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी अनेक देशांनी आपत्कालीन परिस्थिती म्हणून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होती. यानंतर कोरोनाच्या विषाणूवर कोणताच परिणामकारक इलाज न मिळाल्याने बहुतेककरून सगळ्याच देशांनी लोकडाउनचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. याचा जबर फटका सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला बसला असून अर्थव्यवस्थेच्या गाड्याचे रुतलेले चाक पुन्हा गतिमान करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जपानमध्ये देखील कोरोनाच्या विषाणूचा वेग उतरणीला लागल्याने  देशाच्या थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळावी म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील आपत्कालीन आणीबाणी  हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ७ एप्रिल रोजी जपानच्या काही प्रातांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सुरवातीला आणीबाणी लागू करण्यात आली होती व त्यानंतर संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

कोरोनासंदर्भात चौकशीच करायची असेलच तर...; चीनचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले वाचा

यापूर्वी, जपान मधील टोकियो आणि अन्य सात प्रांतसोडून इतर ठिकाणी आणीबाणी हटविली असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिग पाळण्याचे कडक निर्देश जपान सरकार कडून नागरिकांना देण्यात आले होते. संपूर्ण जपान मध्ये आतापर्यंत १६ हजार ५५० नागरिक कोरोना आढळले आहेत. तर ८२० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan Prime Minister Shinzo Abe has lifted the state of emergency imposed nationally to combat coronavirus