5 हजार 800 गायी आणि 42 जणांसह जहाज बुडाल्याची भीती; एकजण बचावला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

५,८०० गायी घेऊन निघालेल्या जहाजावर एकूण ४२ कर्मचारी होते. यापैकी एक कर्मचाऱ्याला जपानच्या नौदलाने वाचवले. हे जहाज समुद्रात उलटून बुडाल्याचा दावा त्याने केला. 

टोकियो - दक्षिण जपानच्या किनाऱ्यावर खराब हवामानामुळे जहाज बुडाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. जपानी अधिकारी या जहाजाचा कसून शोध घेत आहेत. ‘गल्फ लाईव्हस्टॉक १’ हे जहाज पूर्व चीन समुद्रातील अमामी ओशिमा किनाऱ्याहून ५,८०० गायी घेऊन निघाले होते. या जहाजावर एकूण ४२ कर्मचारी होते. यापैकी एक कर्मचाऱ्याला जपानच्या नौदलाने वाचवले. हे जहाज समुद्रात उलटून बुडाल्याचा दावा त्याने केला. 

जवळपास 6 हजार गायी घेऊन जात असलेलं जहाज बुधवारी बेपत्ता झालं होतं. त्याचा तपास जपानचे बचावपथक करत आहे. या जहाजावर 42 जण प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश मिळालं आहे. जहाज बेपत्ता होण्याआधी खराब हवामानामुळे धोका निर्माण झाल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता. 

हे वाचा - अमेरिकेत लशीचा मुहूर्त ठरला पण तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बुधवारी रात्र उशिरा एकाला पाण्यातून वाचवण्यात आलं होतं. फिलिपाइन्सचा असलेला संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. 

याआधी जपानच्या नौदलातील पी-3 सी या गस्त घालणाऱ्या विमानाला एक व्यक्ती पाण्यात दिसला होता. लाइफ जॅकेट घालून जीव वाचवण्यासाठी धडपडताना तो दिसत होता. गल्फ लाइव्हस्टॉक 1 या जहाजावरून बुधवारी धोक्याचा इशारा देणारा मेसेज पाठवण्यात आला होता. 11 हजार 947 टन वजनाचे हे जहाज 5 हजार 800 गायींना घेऊन निघाले होते. दरम्यान, जहाजाचा पत्ता लागला नसल्यानं ते बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या भागात जहाज होतं तिथं मेसक वादळामुले हवामान खराब होतं. जहाजावरील इतर लोकांमध्ये 38 जण फिलिपाइन्सचे, दोघे न्यूझीलंडचे आणि एक जण ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japan ship missing southern 42 members carrying cow