टोकियो : जपानच्या संसदेपैकी वरिष्ठ लोकप्रतिनिधीगृहातील १२४ जागांसाठी रविवारी (ता. २०) मतदान झाले. जपानचे वरिष्ठ सभागृह, हाउस ऑफ कौन्सिलर्समध्ये एकूण २४८ जागा आहेत. .मात्र, त्याच्या निम्म्या जागांसाठी मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. पंतप्रधान शिगेरू इशिबा व त्यांच्या आघाडीला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे..जपानमधील या निवडणुकीत इशिबा यांची आघाडी पराभूत झाल्यास देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. इशिबा यांच्या आघाडीने १२५ जागांच्या बहुमताचे लक्ष्य ठेवले आहे..निकालानंतर त्वरित सरकार बदलले जाणार नाही, कारण वरिष्ठ सभागृहाला नेत्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचे अधिकार नाहीत..Dog Training: ‘एनडीआरएफ’च्या मदतीला शवशोधक श्वाने; देशभरात तैनात करणार, पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात.काय होते मुद्दे?महागाईचा भडका, घटलेले वेतन, तांदळाच्या वाढलेल्या किमती आदी मुद्दे जपानच्या या निवडणुकीसाठी चर्चेत होते. परदेशी रहिवासी आणि पर्यटकांविरोधात अधिक कठोर उपाययोजना करण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. ऑक्टोबरमधील कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत इशिबा यांच्या आघाडीने बहुमत गमावल्यानंतर हे मतदान झाले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.