कोकेनच्या तस्करीसाठी प्रवाशाने गिळली 246 पाकिटं अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

मेक्सिको (जपान) : कोकेनची तस्करी करण्यासाठी एकाने एक-दोन नव्हे तर 246 पाकिटे गिळली. कोकेन तस्करी त्याच्या जीवावर बेतली असून, विमान प्रवासातच त्याला जीव गमवावा लागला.

मेक्सिको (जपान) : कोकेनची तस्करी करण्यासाठी एकाने एक-दोन नव्हे तर 246 पाकिटे गिळली. कोकेन तस्करी त्याच्या जीवावर बेतली असून, विमान प्रवासातच त्याला जीव गमवावा लागला.

अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी विविध प्रकारच्या शक्कल लढवल्या जातात. एका 42 वर्षीय प्रवाशाने कोकेनची 246 पाकिटे गिळली होती. कोलंबियामधील बोगोटा ते टोकियो दरम्यान विमान प्रवासातून तस्करी करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. विमान प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर विमानाचे मेक्सिकोमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याने बोगोटा ते मेक्सिको शहरादरम्यान प्रवास केल्यानंतर जपानला जाणाऱ्या विमानाने पुढील प्रवास सुरु केला होता.

प्रवाशाने कोकेनची 246 पाकिटे गिळली होती. प्रत्येक पाकिट 1 ते 2.5 सेंटीमीरटरचे होते. शवविच्छेदन अहवालात पोटात कोकेनची पाकिटे आढळून आली. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला आहे, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese drug mule swallows 246 packets of cocaine dies mid flight