esakal | ऑलिम्पिक व्हावं की नको? काय वाटतं जपानी नागरिकांना?
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिम्पिक व्हावं की नको? काय वाटतं जपानी नागरिकांना?

ऑलिम्पिक व्हावं की नको? काय वाटतं जपानी नागरिकांना?

sakal_logo
By
विनायक होगाडे

टोकियो : जपानमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा (The Tokyo Olympics 2020) होणार असून या स्पर्धेला जपानी नागरिकांचा विरोध वाढत आहे. जपानमध्ये कोरोना संसर्गाची चौथी लाट असून संसर्ग वेगाने वाढत आहे. तसेच, लसीकरणाचेही (Vaccination) प्रमाण अद्याप कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर बाहेरील लोकांना बोलावून संसर्गात भर घालू नये, अशी मागणी नागरिक करत आहेत. यासाठी ते आंदोलनही करत आहेत. (Japanese people survey about cancellation of Olympic Games due to COVID19)

हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारत कोणाच्या बाजुने?

या पार्श्वभूमीवर येथे एका संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष :

ऑलिम्पिकला विरोध

  • १४ टक्के : नियोजनाप्रमाणे स्पर्धा घ्याव्यात

  • ४३ टक्के : स्पर्धा रद्द कराव्यात

  • ४० टक्के : स्पर्धा पुढे ढकलाव्यात

  • ३ टक्के : प्रतिसाद नाही

असा असेल पाठिंबा

  • ५९ टक्के : प्रेक्षकांशिवाय स्पर्धा घेतल्यास

  • ३३ टक्के : कमी प्रेक्षकांना परवानगी दिल्यास

  • ३ टक्के : नेहमीच्या क्षमतेने प्रेक्षक बोलावल्यास

हेही वाचा: अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा

जपानमध्ये कारोनाची चौथी लाट धडकलेली असताना सरकार मात्र ऑलिंपिक बाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जपानमध्ये केवळ एक टक्काच लसीकरण झाले असून लाखो डोस फ्रिजरमध्ये पडून आहेत. रुग्णालयातील जागेअभावी काही गंभीर रुग्णांना घरीच थांबावे लागत त्यांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. दरम्यान, जपानने आशियायी देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घातले आहेत. नवीन निर्बंध १४ मे पासूनच लागू झाले आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ देशांचा समावेश आहे. जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.