जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची 8 वर्षे पूर्ण केली. शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान ठरले आहेत.

टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंबे आबे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे हे आजारी असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळेच शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे आहे. शिंजो आबे यांनी याची औपचारिक घोषणा केली, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. एका आठवड्यात त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

जपानमधील सत्ताधारी पक्षाने म्हटलं आहे की, शिंजो आबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र त्यांना सातत्याने रुग्णालयात जावं लागत असल्यानं प्रकृतीबाबत अफवा पसरल्या आहेत. गेल्यावेळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिंजो आबे जवळपास 7 तास रुग्णालयात होते. सध्या 65 वर्षांचे असलेल्या शिंजो आबे यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत आहे. 

हे वाचा - शांतता प्रमुखांना इम्रान यांचे आमंत्रण; अफगाण शांततेला चालना देण्याचा हेतू

गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाची 8 वर्षे पूर्ण केली. शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान ठरले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसची परिस्थिती नीट न हाताळल्यानं त्यांची लोकप्रियता कमी झाली होती. त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झाले आहेत. तसंच शिंजो आबे यांनी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पुर्वपदावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese Prime Minister Shinzo Abe may be resign