अबब! जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 15 मिनिटांत 13 अब्ज डॉलरची भर

Jeff Bezos have increase in his asset by 13 million dollar in 15 minutes
Jeff Bezos have increase in his asset by 13 million dollar in 15 minutes

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ऍमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत फक्त 15 मिनिटांत 13.2 अब्ज डॉलरची भर पडली. ऍमेझॉनने चौथ्या तिमाहीतील निकालांची घोषणा केल्यानंतर ऍमेझॉनच्या समभागात 12 टक्‍क्‍यांची वाढ झाल्यामुळे कंपनीचा समभाग 2,100 डॉलरवर पोचला. 

जेफ बेझोस हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. ऍमेझॉनच्या समभागाने उसळी घेतल्यानंतर बेझोस यांच्या संपत्ती फक्त 15 मिनिटांत 13.2 अब्ज डॉलरने वाढली. ऍमेझॉनच्या समभागाच्या सध्याच्या भावानुसार बेझोस यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य जवळपास 129.5 अब्ज डॉलर आहे. बेझोस यांच्याकडे ऍमेझॉनच्या आउटस्टॅंडिंग स्टॉकपैकी 12 टक्‍क्‍यांची मालकी आहे. शेअर बाजारात ऍमेझॉनच्या समभागाने उसळी घेतल्यानंतर ऍमेझॉनच्या बाजारमूल्यात 90 अब्ज डॉलरची भर पडून ते 1 लाख कोटी डॉलरवर पोचले आहे. 

एलॉन मस्कही मालामाल 
टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या संपत्तीतसुद्धा एका तासात 2.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. टेस्ला कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या समभागाचा भाव वधारला. मायक्रासॉफ्टच्या समभागाचा भाव वधारल्याने बिल गेट्‌स आणि स्टीव्ह बॉलमर यांच्या संपत्तीतही भर पडली. फेसबुकची कामगिरी चांगली न झाल्याने कंपनीच्या समभागात घसरण झाली आणि त्यामुळे मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीचे मूल्य 4 अब्ज डॉलरने घटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com