esakal | आई-बापानं 'वकील' केलं, पोरानं त्यांना 'कोर्टात' नेलं; वाचा नेमकं झालं काय
sakal

बोलून बातमी शोधा

आई-बापानं 'वकील' केलं, पोरानं त्यांना 'कोर्टात' नेलं; वाचा नेमकं झालं काय

शिक्षण झाल्यानंतर फैजनं नोकरी शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण

आई-बापानं 'वकील' केलं, पोरानं त्यांना 'कोर्टात' नेलं; वाचा नेमकं झालं काय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

४१ वर्षीय सुशिक्षीत बेरोजगार तरुणानं, आपल्या संपूर्ण आयुष्याचा म्हणजेच पालनपोषणाचा खर्च उचलण्यासाठी जन्मदात्याच कोर्टात खेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे ऑक्सफोर्ड विद्यापीठाची वकिलीची पदवीही आहे. त्या ४१ वर्षीय तरुणाचं नाव फैज सिद्दकी असून सध्या तो ट्रेंड वकील आहे. 

 शिक्षण झाल्यानंतर फैजनं नोकरी शोधण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण त्यानंतर कंटाळून त्यानं नोकरीचा नाद सोडून दिला असून आयुष्यभर आई-बापाने आपल्याला पोसावं आणि आपण तसंच जगावं हा मनाशी निश्चय केला आहे. त्यासाठीच त्याने जन्मदात्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.  

फैज याचे वडील जावेद आणि आई रुक्षंदा हे दुबईला राहतात. या दोघांचं लंडनमध्ये स्वत:चं घर आहे. मागील २० वर्षांपासून फैज आई-वडिलांना दमडीही न देता घरात राहत होता.  या घराची किंमत जवळपास ८ कोटी रुपयांच्या घरात आहे. आतापर्यंत फैजचा सर्व खर्चही जावेद (७१ वर्ष) आणि रुक्षंदा (६९ वर्ष) उचलत होते. 

 आता काही कौटुंबीक कलहामुळे जावेद आणि रुक्षंदा यांना आपल्या  बेरोजगार मुलाच्या पालनपोषणाचा खर्च परवडेनासा झाला होता. तरीही आपण मुलाला आठवड्याला जवळपास ३५ ते ४० हजार रुपये देत असल्याचं या दोघांनी सांगितलं.  एवढेच नाहीतर याआधी महिन्याला सुमारे दीड लाख रुपये,  त्याची सर्व बिले आणि खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसेही देत होतो. पण आता यापुढे फैजचा खर्च उचलणं आपल्याला शक्य नसल्याचंही ते म्हणाले.  

आई-बापांच्या या पवित्र्यानंतर फैज संतापला असून त्यांनी आपली आयुष्यभराची तरतूद केली पाहिजे, आपल्या पालनपोषणाचा सर्व खर्च दिला पाहीजे, असं त्याचं म्हणणं आहे. त्याने हीच मागणी कौटुंबिक न्यायालयात केली होती. तिथे त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्याने हीच याचिका वरच्या कोर्टात दाखल केली आहे.

loading image