
अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीसमोर होणाऱ्या या कार्यक्रमाला ११७ व्या संसदेचे सदस्य आणि त्यांच्याबरोबर एक जण, इतक्याच लोकांना प्रवेश असेल.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुक निकालाप्रमाणेच या पदाची सूत्रे स्वीकारण्याच्या शपथविधी कार्यक्रमाकडेही संपूर्ण जगाचे लक्ष असते. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम यंदा कोरोना संसर्गामुळे मात्र साधेपणाने होणार आहे. पुढील वर्षी २० जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असून बाकीच्यांनी घरातूनच टीव्हीवर हा कार्यक्रम पहावा, असे आवाहन कार्यक्रम समितीने जनतेला केले आहे.
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रॉन कोरोना संक्रमित
अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीसमोर होणाऱ्या या कार्यक्रमाला ११७ व्या संसदेचे सदस्य आणि त्यांच्याबरोबर एक जण, इतक्याच लोकांना प्रवेश असेल. त्यामुळे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधसाठी जनतेने प्रवास करून येऊ नये आणि आपल्या घरी बसूनच या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रम समितीने केले आहे.
- Year End 2020 : वर्षातील 6 मोठ्या आंतरराष्ट्रीय घटना; ज्या सातत्याने राहिल्या चर्चेत
‘बायडेन-हॅरिस यांच्या सत्ताकाळात अमेरिकेच्या वातावरणात एकतेचे, सर्वसमावेशकतेचे आणि सुरक्षिततेचे वातावरण असेल, हे बिंबविण्याचा आम्ही पहिल्याच दिवशी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीच सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठीच आणि परंपरेचाही मान राखण्यासाठी आम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले आहे,’ असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. दर शपथविधीला, कार्यक्रम समितीकडून सुमारे दोन लाख तिकीटांचे वितरण केले जाते.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By: Ashish N. Kadam)