साप डंख मारत असतानाही पत्रकार बोलतच राहिली...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

एक महिला पत्रकार रिपोर्टिंग करत असताना साप डंख मारत राहिला पण तिने आपले काम पुर्ण केले. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : एक महिला पत्रकार रिपोर्टिंग करत असताना साप डंख मारत राहिला पण तिने आपले काम पुर्ण केले. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अरेरे! कोरोनाचा शोध लावलेल्या डॉक्टरचाच दुःखद अंत

पत्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले काम पूर्ण करताना दिसतो. बातमी देताना जीवाला कितीही धोका असला तरीही तो पत्करतो. मग, घटना कोणतीही असो. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियामध्ये एका महिला पत्रकारासोबत घडली.

ऑस्ट्रेलियामधील नेटवर्क नाईनची महिला रिपोर्टर सारा ही सापांच्या सुरक्षतेबद्दलची माहिती देत होती. यावेळी तिने गळ्यात साप गुंडळला होता. रिपोर्टिंग सुरू केल्यानंतर सापाने अचानक हालचाल सुरू केली. पण, साराने चेहऱयावर भीती जाणू न देता कॅमेऱ्यासमोर आपले काम सुरूच ठेवले. दरम्यान, सापाने बुम माईकला डंख मारला. मात्र, यावेळी सारा किंचाळली. यावेळी थोडा वेळ तिने थांबून सापाच्या हालचालीकडे लक्ष दिले. सापाची हालचाल सुरूच होती. एक वेळा डंख मारून साप थांबला नाही तर त्याने तीन वेळा बुम माईकला डंख मारला. पण, साराने रिपोर्टिंग पूर्ण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: journalist left terrified after snake attacks her mic at australia