esakal | लाईव्ह बंद झालं समजून बीबीसीच्या पत्रकाराने...
sakal

बोलून बातमी शोधा

BBC Reporter

लाईव्ह बंद झालं समजून बीबीसीच्या पत्रकाराने...

sakal_logo
By
सुधीर काकडे

लाईव्ह स्क्रीनवर पत्रकारांकडून चुका झाल्याचे अनेकवेळा आपल्याला दिसून येतात. अँकरिंग करताना झालेल्या चुकांचे व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. अफगाणिस्तानधील परिस्थितीचे वार्तांकन करत असताना बीबीसीचे पत्रकार डेन जॉन्सन यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

बीबीसीचे पत्रकार डेन जॉ़न्सन हे अफगाणिस्तानच्या विषयावर रिपोर्टींग करत होते. यावेळी लंडनहून बीबीसीच्या स्टूडीओमधील अँकर या कार्यक्रमाचे अँकरिंग करत होते. हा कार्यक्रमा सुरु असतानाच जॉन्सन यांच्याकडे विज खंडीत झाली. विज खंडीत झाल्याने बराच काळ त्यांना अँकरचा आवाजच आला नाही. यावेळी डेन जॉन्सने काही काळ वाट पाहिली आणि आवाजच येत नसल्याने कंटाळून तिथून उठून गेले. जॉन्सन यांनी उठत असताना, धीस जॉब मॅन धीस जॉब असे म्हणत कॅमेऱ्यासमोरून रागात बाजूला गेले. मात्र हे सर्व लाईव्ह गेलं, आणि अँकरला सुद्धा हसू आवरता आलं नाही.

जॉन्सन यांनी हा व्हिडीओ स्वत: आपल्या ट्विटवर शेअर केला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी नेहमी लाईव्ह आहे अस समजून काम करा, म्हणजे अशी पंचाईत होणार नाही, असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

loading image
go to top