विकिलिक्सचे संस्थापक असांजेला तुमच्याकडे सोपवणार नाही; यूकेनं अमेरिकेला ठणकावलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

ब्रिटनच्या न्यायालयाने विकीलीक्सचे संस्थापक जूलियन असांजे (Julian Assange) याला प्रत्यार्पित करण्याची अमेरिकेची मागणी फेटाळली आहे.

लंडन- ब्रिटनच्या न्यायालयाने विकीलीक्सचे संस्थापक जूलियन असांजे (Julian Assange) याला प्रत्यार्पित करण्याची अमेरिकेची मागणी फेटाळली आहे. असांजे यांच्यावर एक दशकापूर्वी अमेरिकी सैन्याचे गोपनीय डॉक्युमेंट प्रकाशित केल्याप्रकरणी हेरगिरीचा आरोप लावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश वनैसा बाराइस्टर यांनी लंडनमधील सेंट्रल क्रिमिनल कोर्टमध्ये आपला निर्णय सुनावला. याप्रकरणी तीन आठवड्यांपासून सुनावणी सुरु होती.

असांजे यांना अमेरिकेमध्ये पाठवलं तर तो आत्महत्या करु शकतो. अमेरिकेने असांजे याच्याविरोधात हेरगिरीचे 17 आरोप लावले आहेत. एक आरोप कॉम्प्युटर गैरवापराचाही आहे. या गुन्ह्याखाली 175 वर्षांचा तुरुंगवास दिला जातो. 

सॅमसंग आणतंय स्वस्तातले फोन; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

अमेरिकेचा असांजेवर आरोप

ऑस्ट्रेलियाचा 49 वर्षीय नागरिक असलेल्या असांचेच्या वकीलांनी कोर्टात म्हटलं की, ते पत्रकार म्हणून आपलं काम करत होते, त्यामुळे डॉक्यमेंट प्रकाशित करण्यासाठी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत संरक्षण द्यावं. या डॉक्युमेंटमध्ये अमेरिकी सैनिकांनी इराक आणि अफगाणिस्तानमध्ये कथितपणे केलेल्या चुकीच्या कामांची माहिती आहे. असांजेच्या कायदेशीर टीमने अमेरिकेवर राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षा संबंधित माहिती मिळवणे आणि प्रकाशित करणे असे गुन्हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकी सरकारच्या वकीलांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज 

2010 मध्ये स्वीडनच्या आग्रहानंतर लंडन सरकारने त्यांना अटक केली होती. स्वीडन दोन महिलांकडून लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरुन असांजे यांची चौकशी करु इच्छित होते. स्वीडन जाण्यापासून वाचण्यासाठी असांजेने 2012 मध्ये लंडनच्या इक्वेडोरमधील दूतावासात शरण घेतला. त्यामुळे तो ब्रिटन आणि स्वीडनच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर गेला होता. 

एप्रिल 2019 मध्ये दूतावासातून बाहेर आल्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी त्याच्यावर पळून जाण्याचा आरोप ठेवत अटक केली. स्वीडनने नोव्हेंबर 2019 मध्ये बलात्काराचे आरोप मागे घेतले. लंडनमधील तुरुंगात असताना त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणी सुनावणी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Julian Assange Can not Be Extradited To US Says British Court