
10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती 4 जीबी रॅमसह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माण करणारी कंपनी नव्या वर्षातील नवे डिझाईन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आठवड्यात सॅमसंगचा माफक दरातील स्मार्टफोन Samsung Galaxy M02s बाजारात येणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 10 हजारपेक्षाही कमी असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने अधिकृतरित्या अद्याप किंमतीसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण स्मार्टफोनमध्ये काय फिचर्स असतील याची माहिती समोर आली आहे.
काय असतील या स्मार्टफोनची फिचर्स
IANS ने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, गॅलेक्सी M02s स्मार्टफोन 6.5 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज या दोन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध होतील. 2021 मध्ये बाजारात येणाऱ्या या स्मार्टफोनसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन! 150 पेक्षा कमी रुपयांमध्ये मिळवा 24 GB डेटा, फ्री कॉलिंग
10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती 4 जीबी रॅमसह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी M02s ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन (Amazon) आणि देशभरातील रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. गॅलेक्सी M सॅमसंगची लोकप्रिय सीरीज आहे. त्यामुळेच मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत सॅमसंग भारतातील स्मार्टफोनची आघाडीची कंपनी राहिली होती.
नुकतेच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी M01s स्मार्टफोनच्या किंमती 500 रुपयांनी कपात केल्या होत्या. आता हे स्मार्टफोन 8,999 रुपयांना उपलब्ध आहेत. 6.2 इंच इनफिनिटी-व्ही डिस्प्ले, 13.0 MP + 2.0 MP चा ड्युअल रियर कॅमेरा, 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज, मीडियाटेक हीलिओ MT6762 प्रोसेसर, आण 4000mAh क्षमतेची बॅटरी मिळते.